ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मार्गेश्वर हडी संघ ठरला एस.पि.एल. मुंबई 2022 चा विजेता..!

मार्गेश्वर हडी संघ ठरला एस.पि.एल. मुंबई 2022 चा विजेता..!

प्रकाशन: 11 Apr 2022 10:05 PM
वाचन संख्या 78

कोकण बाॅईज मालवणकडे उपविजेतेपद..!

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग फ्रेंड्स सर्कल गृप मुंबई आयोजित सिंधुदुर्ग प्रीमियर लीग SPL मुंबई http://localhost/news/public/uploads/2022 क्रिकेट स्पर्धेत मार्गेश्वर हडी संघाने कोकण बॉईज मालवण संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले. सिंधुदुर्ग टायटन, मसुरे पॅकर्स संघाने तृतिय क्रमांक पटकावला. यात 32 संघांनी सहभाग घेतला होता.

मार्गेश्वर हडी मालवण यांना SPL आयोजन कमिटी तर्फे आकर्षक चषक व आमदार नितेशजी राणे पुरस्कृत 22,222 रुपये रोख रक्कम देण्यात आली. तसेच द्वितीय क्रमांकाचे मानकरी कोकण बॉईज मालवण यांना SPL आयोजन कमिटी तर्फे आकर्षक चषक व आमदार नितेश राणे पुरस्कृत 11,111 रुपये रोख रक्कम देण्यात आली तसेच तृतीय क्रमांक सिंधुदुर्ग टायटन आणि मसुरे पॅकर्स ( मसुरे) या संघाला डॉ अमित दुखंडे यांचा तर्फे दोन्ही टीमला आकर्षक चषक आणि श्री विकास पालव यांचा तर्फे रोख रक्कम 1111 रुपये देण्यात आले. तसेच फायनलला पोहोचलेल्या दोन्ही संघाना सौ. अश्विनी परब ( परबीन) यांच्या तर्फे सर्व खेळाडूंना मेडल देऊन सन्मानित केले

तसेच या स्पर्धेचे आयोजक चेतन रासम, वसंत परब, अनिल मातेफोड, दीपक रासम, स्वप्नील तेली, महेश चव्हाण, अमित धुरी या मुंबईकर फ्रेंड्स सर्कलने केले होते .या गृप ला श्री विनायक अपराज, श्री प्रताप रासम, श्री तुकाराम रासम, श्री अभिजित रासम, श्री दीपक येसादे, डॉ श्री अमित दुखंडे यांचे मार्गदर्शन लाभले.
स्पर्धेचे समालोचन समीर पांढरे, वैभव गावडे , सिद्धेश ( युवा ) यांची साथ लाभली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स