भाजपा वेंगुर्ला तालुक्यातर्फे स्थापना दिनानिमित्त समाजोपयोगी उपक्रम संपन्न.
चिंदर | विवेक परब : भाजप स्थापना दिना निमित्त संपूर्ण महाराष्ट्र मध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून विविध समाजपयोगी उपक्रम राबवले जातात या अनुषंगाने भाजप वेंगुर्ला तालुक्यावतीने भाजप स्थापना दिन ६ एप्रिल ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती १४ एप्रिल पर्यत वेंगुर्ला तालुक्यामध्ये विविध ठिकाणी समाजपयोगी उपक्रम राबवण्याचा संकल्प केला आहे. या नुसार विविध ठिकाणी भाजपचा ध्वज फडवण्यात आला. तसेच शिरोडा, आरवली, सागरतीर्थ येथील ३० दिव्यांग बांधवांना भेटवस्तू देईन सन्मानीत करण्यात आले. सोन्सूरे येथील स्वयं शिवभवानी गजान्तलक्ष्मी संस्थान येथे हा सन्मान कार्यक्रम संस्थानचे प.पू.आजोबा महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. संस्थानचे भक्त व ज्येष्ठ चित्रकार दिपक गावडे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केल या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांमध्ये रेडी जि.प.सदस्य प्रितेश राऊळ, भाजप वेंगुर्ला तालुका सरचिटणीस बाबली वायगंणकर, भाजप सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले. भाजप शिरोडा शहर अध्यक्ष श्रीकृष्ण धानजी यांनी दिव्यांग व्यक्तीच्या लाभार्थी ची नांवे वाचून त्याप्रमाणे मान्यवरांच्या हस्ते दिव्यांगाना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
या वेळी व्यासपीठावर भाजप जिल्हा मच्छीमार नेते दादा केळुस्कर, वेंगुर्ला तालुका अध्यक्ष सुहास गवंडळकर, वेंगुर्ला तालुका उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, भाजप शिरोडा शहर ज्येष्ठ पदाधिकारी मनोहर होडावडेकर, अनिल गावडे, आरवली, सागरतीर्थ, शक्ती केंद्र प्रमुख महादेव नाईक, विजय बागकर, शिरोडा गावचे सरपंच मनोज उगवेकर, भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रकाश रेगे, आरवली ग्रामपंचायत सदस्य सौ.सायली कुडव, समीर कांबळी आदी उपस्थित होते. शेवटी आभार आरवली गावचे सरपंच तातोबा कुडव यांनी मानले.
या कार्यक्रमाला रेडी जि.प.मधील भाजपचे रेडी, शिरोडा, शक्ती केंद्र प्रमुख जगन्नाथ राणे, विदयाधर धानजी, आरवली भाजप पदाधिकारी रवींद्र कुडाळकर, पपू चिपकर, संतोष मांतोडकर, वेणू चिपकर, भाजप रेडी ग्राम कमिटी अध्यक्ष ज्ञानेश्वर केरकर, उपाध्यक्ष ओकांर कोनाडकर, भाजप शिरोडा शहर युवा मोर्चा अध्यक्ष सोमाकांत सावंत, सागरतीर्थ भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी देवेंद्र उर्फ बाळू वस्त, या संस्थानचे डाॅ.एकसष्टी चिपकर,व आरवली, सोन्सूरे, सागरतीर्थ, शिरोडा, रेडी येतील भाजप पदाधिकारी व ग्रामस्थ आदि उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)