ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
पळसंब गावात अभ्यासातून आर्थिक साक्षरता विषयक सेमिनार संपन्न ; शेअर्स विषयाची झाली युवकांना प्राथमिक ओळख.!

पळसंब गावात अभ्यासातून आर्थिक साक्षरता विषयक सेमिनार संपन्न ; शेअर्स विषयाची झाली युवकांना प्राथमिक ओळख.!

प्रकाशन: 08 Apr 2022 12:04 AM
वाचन संख्या 191

चिंदर | विवेक परब : श्री जयंती देवी सांस्कृतिक, कला, क्रीडा मंडळ, पळसंब यांच्या संकल्पनेतून ‘शेअर मार्केट आणि गुंतवणूक पर्याय’ या विषयांवर प्राथमिक माहिती देणारे सेमिनार श्री जयंती देवी मंदिरात संपन्न झाले.

या वेळी गुंतवणूक सल्लागार श्री.धनंजय सावंत यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. ग्रामीण भागात आर्थिक साक्षरता वाढावी, रुजावी हा या सेमिनारचा उद्देश होता.  पळसंब गावातील नागरिकांची आणि युवा वर्गाची विशेष उपस्थिती होती.

यावेळी पळसंब सरपंच श्री .चंद्रकांत गोलतकर, विशेष कार्यकारी अधिकारी  प्रमोद सावंत , देवस्थान मानकरी श्री . योगेश कापडी , मंडळाचे सदस्य श्री .अमित पुजारे,वैभव परब, हितेश सावंत,अमरेश पुजारे,प्रसाद पुजारे,मनिष पुजारे, प्रभू लाड ,अनिकेत परब, मंदार सावंत, प्रणय पुजारे, सूरज सावंत, विघ्नेश सावंत, दाजी जुवेकर ,ऋतीक पुजारे इत्यादी उपस्थित होते .

पळसंब गांवचे युवा लेखक आणि समाजशील आयोजक श्री. रोशन चिंचवलकर यांनी या सेमिनारचे नियोजन केले होते. या सेमीनारचा उपयोग नक्कीच होतोय व भविष्यात यापुढील टप्प्यांचे सेमीनार आयोजीत करणे ही आर्थिक साक्षरतेची गरज असल्याचे प्रतिपादन पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी माध्यमांशी बोलताना केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स