गवंडीवाड्यातील सुप्रसिद्ध श्रीराम जन्मोत्सवात सादर होणार 'स्वामी..!'
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या गवंडीवाड्यामध्ये रविवारी दि. १० एप्रिल २०२२ रोजी श्रीराम जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्रीराम जन्मोत्सव निमित्त पुढील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी दि. १० एप्रिल रोजी सकाळी ११.००वा.श्री बाळ कासलरकर यांचे सुश्राव्य किर्तन. दुपारी १२.३०वा.श्रीराम जन्म, दुपारी १.००ते ३.००वा. महाप्रसाद. रात्रौ ९.०० वा. खेळ पैठणीचा इच्छुक स्पर्धकांनी आपली नावे रोहित परुळेकर -९४२१२६८६१६, आराध्या गवंडी -९४०५८०५८५० यांच्या कडे द्यायची आहेत.
बुधवार दि. १३ एप्रिल रोजी रात्रौ १०.०० वा. रेकॉर्ड डान्स (इच्छुकांनी आपली नावे श्री. दिनेश वराडकर, मो ९०४९०८११८१ यांच्या जवळ द्यायची आहेत.)
शनिवारी दि. १६ एप्रिल रोजी सकाळी ६.००वा. हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येईल. रात्री 10 वाजता ‘स्वामी’ ही हळुवार प्रेमकथा सादर केली जाणार आहे.
या संपूर्ण धार्मिक,सामाजिक आणि सांस्कृतिक सोहळ्याचा सर्वांनी जास्तीतजास्त लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)