ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
वैभववाडी तालुक्यातील कमळ चषक क्रिकेट स्पर्धेची चार ठिकाणे घोषीत..!

वैभववाडी तालुक्यातील कमळ चषक क्रिकेट स्पर्धेची चार ठिकाणे घोषीत..!

प्रकाशन: 06 Apr 2022 12:08 PM
वाचन संख्या 125

भाजपा तालुका अध्यक्ष नासीर काझी यांची माहिती.

वैभववाडी | नवलराज काळे : केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी तालुक्यात चार ठिकाणी कमळ चषक २०२२ बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा कोळपे, लोरे व कोकिसरे या जि. प. मतदार संघात तसेच वैभववाडी शहर या ठिकाणी होणार आहे अशी माहिती वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी यांनी दिली आहे.

कमळ चषक क्रिकेट स्पर्धेची रूपरेषा पुढीलप्रमाणे – कोळपे जिल्हा परिषद मतदार संघात दिन. 10 ते 13 एप्रिल या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा ओव्हरआर्म पध्दतीने होणार आहे. तिथवली येथील भालेकर मैदान या ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे. अधिक माहितीसाठी संतोष हरयाण 7756868230, साजीद काझी 9766225565, राजकिरण हरयाण 9967240049 यांच्याशी संपर्क साधावा.

लोरे जि. प. मतदार संघात दि. 12 व 13 एप्रिल रोजी ही स्पर्धा डे नाईटला संध्याकाळी 5 ते रात्री 12 या कालावधीत खेळविली जाणार आहे. अंडरआर्म( हॅन्ड लाॅक) पध्दतीने ही स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा सांगुळवाडी पाटीलवाडी येथे होणार आहे.10 एप्रिल http://localhost/news/public/uploads/2022 पर्यंत इच्छुक संघानी नाव नोंदणी करून घ्यायची आहे 11एप्रिल http://localhost/news/public/uploads/2022 ला एकही संघ सामील करून घेतला जाणार नाही याची सर्व टिम ने काळजी घ्यावी,अधिक माहितीसाठी अक्षय पाटील 9689418286, कल्पेश रावराणे 8275495827 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कोकिसरे जि. प. मतदार संघात ही स्पर्धा दिनांक 14 ते 16 एप्रिल या कालावधीत संध्याकाळी 5 ते रात्री 12 या वेळेत खेळविली जाणार आहे. अंडरआर्म पध्दतीने ही स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा उंबर्डे येथील गांगेश्वर मैदान या ठिकाणी होणार आहे. अधिक माहितीसाठी किशोर दळवी 9421648429, बोबडे सर 7773915844, रज्जब रमदुल 8208545396, यांच्याशी संपर्क साधावा.

वाभवे – वैभववाडी शहर या ठिकाणी दि. 10 व 11 एप्रिल रोजी ही स्पर्धा डे नाईट संध्याकाळी 5 ते रात्री 12 या वेळेत होणार आहे. अंडरआर्म पध्दतीने ही स्पर्धा होणार आहे. येथील दुर्गामाता उत्सव चौक या ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे. अधिक माहितीसाठी संजय सावंत 8888404034, विवेक रावराणे 9975607575, रोहन रावराणे 9075637722, यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन नासीर काझी यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स