सावंतवाडीचे पैलवान ललित हरमलकर व गणेश राऊळ यांच्याकडे ६४ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत जिल्हा प्रतिनिधित्व..
सावंतवाडी | प्रतिनिधी : सातारा येथे ४ एप्रिल ते ९ एप्रिल दरम्यान चालू असलेल्या ६४ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नेतृत्व सावंतवाडीतील मल्लसम्राट प्रतिष्ठान सावंतवाडी या प्रतिष्ठानचे पैलवान ललित हरमलकर व पैलवान गणेश राऊळ नेतृत्व करत आहेत.
या खेळाडूंना श्री पाटील व पैलवान हर्षद मोर्जे यांचे मार्गदर्शन लाभत आहे .
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रिडा प्रेमी आणि कुस्तीपटूंचे त्यांच्या कामगिरीवर विशेष लक्ष आहे असे मैदानी खेळांचे प्रसारक व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले दाभोळीचे क्रिडा महर्षी श्री अशोक दाभोलकर मेस्त्री यांनी सांगितले आहे.
मल्लप्रतिष्ठानचे अध्यक्ष जावेद शेख, उपाध्यक्ष योगेश बेळगांवकर ,गौरव कुडाळकर नागेश सूर्यवंशी यांनी ललित हरमळकर व गणेश राऊळ यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)