ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
<em>मडूरेत ३५ वर्षांवरील क्रिकेट स्पर्धेत गोठणेश्वर संघ अजिंक्य..!</em>
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

<em>मडूरेत ३५ वर्षांवरील क्रिकेट स्पर्धेत गोठणेश्वर संघ अजिंक्य..!</em>

प्रकाशन: 05 Apr 2022 10:22 PM
वाचन संख्या 55

आई भवानी संघ ठरला उपविजेता..

बांदा | राकेश परब : मडुरा येथील ३५ वर्षांवरील मडुरा प्रिमीअर लीजेंड क्रिकेट लीग २०२२ चे विजेतेपद गोठणेश्वर संघाने पटकाविले. आई भवानी वॉरीयर्स संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. मान्यवरांच्या उपस्थितीत विजेत्या संघांना चषक व रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. बाबरवाडी येथील राजे शिवछत्रपती मैदानावर प्रथमच आयोजित लीजेंड क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

मडुरा गावात प्रथमच ३५ वर्षांवरील खेळाडूंसाठी क्रिकेट लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन कोलझर हायस्कूलचे शिक्षक सुनील परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रोणापाल सरपंच सुरेश गावडे, उपसरपंच विजय वालावलकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष बाळू गावडे, माजी उपसरपंच उल्हास परब, सोसायटी चेअरमन संतोष परब, प्रकाश सातार्डेकर, रमाकांत धुरी, संघमालक नारायण मोरजकर, प्रमोद धुरी, हिराजी परब, दीपक घाडी, एकनाथ खर्डे, दाजी सातार्डेकर, तुषार धुरी, विनोद वालावलकर, योगेश तळवणेकर उपस्थित होते.

स्पर्धेत स्वामी माऊली, ए स्टार इलेव्हन, दक्ष लायन्स फायटर, माऊली बॉईज, गोठणेश्वर व आई भवानी वॉरीयर्स हे सहा संघ सहभागी झाले होते. स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना दक्ष लायन्स व आई भवानी संघात झाला. यात आई भवानी संघ विजयी झाला. दुसरा उपांत्य सामना गोठणेश्वर व ए स्टार इलेव्हन संघात होऊन गोठणेश्वर संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम चुरशीच्या सामन्यात गोठणेश्वर संघाने विजय प्राप्त करुन विजेतेपदावर कब्जा केला. आई भवानी वॉरीयर्स संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.

मान्यवरांच्या हस्ते विजेत्या गोठणेश्वर संघ व उपविजेत्या आई भवानी संघाला चषक व रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. मालिकावीर रामदास शेळके, उत्कृष्ट फलंदाज दाजी सातार्डेकर व उत्कृष्ट गोलंदाज धुरी यांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले. ३५ वर्षांवरील खेळाडूंसाठी लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याने वरिष्ठ खेळाडूंनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या.

स्पर्धेत पंच म्हणून रवी पेडणेकर व सौरभ परब यांनी काम पाहिले. घनश्याम वालावलकर, प्रणव परब, प्रज्ञेश परब, अविनाश परब, गणेश सातार्डेकर, विनोद वालावलकर यांनी समालोचन केले. सुत्रसंचलन व आभार तुषार धुरी यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स