ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
काळसे गावच्या मुख्य रस्त्यावर गतिरोधक घालण्यासाठी शिवसैनिकांनी दिले बांधकाम अधिकाऱ्यांना निवेदन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

काळसे गावच्या मुख्य रस्त्यावर गतिरोधक घालण्यासाठी शिवसैनिकांनी दिले बांधकाम अधिकाऱ्यांना निवेदन.

प्रकाशन: 05 Apr 2022 02:36 PM
वाचन संख्या 42

वाढत्या अपघातांनंतर ग्रामस्थांची मागणी.

चौके | अमोल गोसावी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘मालवण नेरुरपार कुडाळ’ या मार्गावर धामापूर ते नेरुरपार दरम्यानच्या रस्त्यावर भरधाव वाहनांमधील अपघातांची संख्या वाढल्यामुळे काळसे धामापूर मधील ग्रामस्थांनी वाहनांच्या जीवघेण्या वेगाला आवर घालण्याची इच्छा व्यक्त केली होती.

ग्रामस्थांच्या या मागणीचा पाठपुरावा म्हणून पेंडूर विभागातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी काळसे गावात श्री. शिवाजी विद्यामंदिर काळसे आणि , जि. प. प्राथमिक शाळा न. १ येथे गतिरोधक घालण्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवणचे कनिष्ठ अभियंता नितिन दाणे यांना निवेदन दिले.
यावेळी पेंडूर शिवसेना विभागप्रमुख अण्णा गुराम , पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे, बाळ महाभोज , बाबू टेंबुलकर , विष्णू लाड , आणि शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
मालवण – कुडाळ मुख्य रस्त्यावर धामापूर ते नेरुरपार दरम्यानच्या रस्त्याच्याकडेला मोठी लोकवस्ती आहे तसेच प्राथमिक शाळा आणि काळसे हायस्कूलही रस्त्याकडेलाच आहे. या मार्गावरून चिरे, वाळू वाहतूक करणारे अनेक डंपर तसेच गोवा येथून मालवणच्या दिशेने पर्यटकांना घेउन जाण्याऱ्या मिनीबस आणि टेंपो ट्रॅव्हलर भरधाव वेगाने ये जा करतात. अशावेळी रस्त्याकडेला शाळा असल्याने विद्यार्थीही रस्त्यावर प्रवास करत असतात. भरधाव वाहनांमुळे मुलांच्या जिवीतास धोका पोहोचू शकतो त्यामुळे अनेक पालक आणि जागरूक ग्रामस्थांनी वारंवार धामापूर भगवती मंदिर ते नेरुरपार होबळीचा माळ या परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाने किमान चार ठिकाणी तरी गतिरोधक घालावे अशी मागणी केली होती. या मागणीला अनुसरूनच शिवसैनिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागास गतिरोधक उभारणीसाठी लेखी निवेदन दिले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स