ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
जिल्हा बॅंकेच्या दुग्धविकासाच्या सुबक योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा : व्हिक्टर डान्टस.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

जिल्हा बॅंकेच्या दुग्धविकासाच्या सुबक योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा : व्हिक्टर डान्टस.

प्रकाशन: 05 Apr 2022 02:44 PM
वाचन संख्या 96

चौके |‍ अमोल गोसावी :आर्थिक शिस्त असेल तर कोणतीही संस्था मोठी होण्यास वेळ लागत नाही. सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेने दुधाळ जनावरांच्या खरेदीसाठी अतिशय सुबक अशी कर्जयोजना दोनच दिवसांपुर्वी जाहीर केली आहे. त्याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ उठवावा आणि दुग्धोत्पादन वाढवावे. जिल्ह्यातील यशस्वी उद्योजक शेतकऱ्यांचा अनुभव आणि त्यांचे मार्गदर्शन घेऊन पारंपरिक पद्धती सोडून आधुनिक पध्दतीचा अवलंब करावा. दूध उत्पादनाबरोबरच जिल्ह्यातच अधिक मागणी असलेल्या दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीवरही शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. अशा प्रकारच्या सर्व उद्योगांच्या उभारणीसाठी शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य करण्यास सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक सदैव तत्पर असल्याचे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक संचालक श्री. व्हिक्टर डान्टस यांनी पेंडूर येथे श्री वेताळ दुग्ध उत्पादक सहकारी संस्था मर्या. पेंडूर च्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना केले.

मालवण तालुक्यातील पेंडूर गावातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी काही शेतकऱ्यांनी एकत्र येत श्री वेताळ दुग्ध उत्पादक सहकारी संस्था मर्या. पेंडूर ची स्थापना केली. या संस्थेचा तसेच संस्थेच्या दुध संकलन केंद्राचा उद्घाटन सोहळा श्री. सुरेश रा. परब यांच्या अध्यक्षतेखाली आणि सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक संचालक श्री. व्हिक्टर डान्टस यांच्या हस्ते सोमवार दिनांक ४ एप्रिल रोजी संपन्न झाला. यावेळी माजी शिक्षण संस्था अध्यक्ष बाबाराव राणे, कॉंग्रेस सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर , माजी वित्त बांधकाम सभापती संतोष साटविलकर , कॉंग्रेस ओबीसी सेल अध्यक्ष महेश अंधारी, पेंडूर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष विनायक सावंत , सहाय्यक निबंधक श्री. धुळप, सरपंच सुनिता मोरजकर , माजी सरपंच साबाजी सावंत , गोकुळ दुध संघाचे डॉ. राजेश गावकर, डॉ. रेडकर , पोलीस पाटील विश्वास मालवणकर , पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. तेली, मार्गदर्शक डॉ. सावंत , सत्यवान सावंत , गिरीश गावडे, विष्णू पेंडूरकर ( बाबा ) , आतिक शेख ,नितीन राऊळ , मनोज राऊळ, सुभाष सावंत.
श्री वेताळ दुग्ध उत्पादक संस्थेचे अध्यक्ष प्रदीप सावंत , उपाध्यक्ष दाजी सावंत , सचिव सतिश कांबळी आणि सर्व संचालक आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रविण सावंत यांनी केले तर आभार प्रदीप सावंत यांनी मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स