ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
हडपीड येथे स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सवाची उत्साहात सांगता!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

हडपीड येथे स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सवाची उत्साहात सांगता!

प्रकाशन: 04 Apr 2022 11:22 AM
वाचन संख्या 77

मठाच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” असा जयघोष आणि “स्वामी समर्थ नामाच्या” नामघोषात हडपीड येथे स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा भाविकांच्या अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला.

Article image


श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड येथे श्री स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा व मठाचा तृतीय वर्धापन दिन सोहळा निमित्ताने ३  व ४ एप्रिल रोजी  विविध  धार्मिक , सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Article image


रविवारी  पादुका पूजन, अभिषेक होम-हवन, सत्यनारायण महापूजा, दुपारी पालखी मिरवणूक आणि महाआरती, दुपारी महाप्रसाद , निवडक गरजू महिलांसाठी कोकण कट्टा संस्था मुंबई व स्वामी समर्थ मठ यांच्या वतीने शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. सायंकाळी श्री नवलाईदेवी ढोल पथक वाघोटन झलक यांचे सुस्वर भजन, श्री स्वामी समर्थ महिला भजन मंडळ जोगेश्वरी यांचे सुस्वर भजन, श्री गांगेश्वर सेवा मंडळ निमतवाडी शिरगाव यांचे सुस्वर भजन, श्री संदीप फडके वाडा नाडण यांचे स्वरयात्री प्रस्तुत भक्तिरंग कार्यक्रम झाला. रात्री आमने-सामने डबलबारी भजनाचा जंगी सामना बुवा श्री संदीप पुजारे नाडण-देवगड विरुद्ध बुवा श्री समीर कदम पोखरण कुडाळ यांच्यामध्ये झाला. तर  सोमवार ४ एप्रिल रोजी सकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत ब्रह्ममुहूर्तावर सर्वाग स्नान आणि सहस्त्रधारा अभिषेक , सकाळी ८ ते १० रुद्राभिषेक आदी कार्यक्रम झाले. दोन दिवसात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्वामींचे दर्शन घेतले. प्रकट दिनाच्या पूर्व संध्येला मठ ते शिरगाव पर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपिड देवगड कार्यकारी गाव समिती, श्री स्वामी समर्थ कार्यकारी सभासद मुंबई सदस्य, तसेच मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रभाकर राणे, संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर व विश्वस्त ज्ञानेश्वर राऊत आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स