ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
सिंधुदुर्ग-गोवा नवोदीत काव्य लेखन स्पर्धेत सौ. वर्षाराणी अभ्यंकर ठरल्या अव्वल...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

सिंधुदुर्ग-गोवा नवोदीत काव्य लेखन स्पर्धेत सौ. वर्षाराणी अभ्यंकर ठरल्या अव्वल...!

प्रकाशन: 04 Apr 2022 11:51 AM
वाचन संख्या 62

अध्यक्षस्थानी कवयित्री डाॅ. उर्मिला चाकुरकर व उद्घाटक कवयित्री तथा कोमसाप अध्यक्ष नमिता किर ठरल्या विशेष आकर्षण…!

चिंदर | विवेक परब : आरती मासिक, श्रीराम वाचन मंदिर व कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज श्रीराम वाचन मंदिर सभागृहात निमंत्रितांचे १६ वे विभागीय कवयित्री संमेलन संपन्न झाले. सिंधुदुर्ग, गोवा नवोदित काव्य लेखन स्पर्धेत सौ. वर्षाराणी बलवंत अभ्यंकर यांना प्रथम क्रमांकाचे, मृण्मयी बांदेकर यांना व्दितीय तर राधीका तेंडोलकर यांना तृतीय तसेच निता कामत, त्रिवेणी घाडी, अक्षता तांबे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.अध्यक्षस्थानी पैठण येथील जेष्ठ कवयित्री डाॅ. उर्मिला चाकुरकर व उद्घाटक म्हणून रत्नागिरी येथील कवयित्री व कोमसाप अध्यक्ष नमिता किर होत्या. मान्यवर म्हणून अनघा तांबोळी(वाशी), प्रा. दिपा ठाणेकर(ठाणे), अनुराधा म्हापणकर(मुंबई), चित्रा क्षीरसागर(गोवा), प्रा. आदिती बर्वे (गोवा) तर मनिषा पाटील(कणकवली), मधुरा माणगांवकर(मालवण), शालिनी मोहळ(ओरोस), अनुष्का रेवंडकर(कुडाळ), मिनाक्षी अळवणी(बांदा), प्रा. हर्षवर्धिनी सरदार, मंगल नाईक, स्नेहा नाईक या सिंधुदुर्गातील कवयित्री उपस्थित होत्या.आयोजक प्रतिनिधी उषा परब, आरती मासिक अध्यक्ष केशव भागवत, श्रीराम वाचन मंदिर सचिव रमेश बोंद्रे, सावंतवाडी कोमसाप अध्यक्ष ॲड संतोष सावंत उपस्थित होते. संयोजक सहाय्यक डाॅ. अनुजा जोशी, तर संमेलन समिती माधव शिरसाट, मेघना राऊळ, प्रतिभा चव्हाण, प्रज्ञा मातोंडकर व स्मिता परब उपस्थित होत्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स