<em>श्रीकांत सांबरी यांना 'मधु वालावलकर समाजसेवक पुरस्कार' जाहीर.</em>
चिंदर | विवेक परब : आचरे येथील श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिरचे विद्यमान अध्यक्ष श्रीकांत रघुनाथ सांबारी यांना बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवणचा ‘मधु वालावलकर समाज सेवक पुरस्कार’ जाहीर झाला आहे. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असून सदर पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक 8 मे http://localhost/news/public/uploads/2022 रोजी संध्याकाळी 4 ते 6 वाजता एका विशेष कार्यक्रमात होणार आहे. सदर पुरस्कार वितरण सोहळा श्री देव रामेश्वर वाचन मंदिर आचरे येथील सभागृहात सेवांगणचे विद्यमान अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे, अशी माहिती बॅरिस्टर नाथ पै सेवांगणचे कार्याध्यक्ष दीपक भोगटे यांनी दिली. सेवांगणचे संस्थापक सदस्य स्वर्गीय मधु वालावलकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समाजसेवी वृत्तीने कार्य करणाऱ्या समाज सेवकास प्रदान केला जातो. यावर्षीचा 22 वा पुरस्कार श्री.श्रीकांत सांबारी यांना जाहीर करतात करण्यात आला आहे.
श्रीकांत रघुनाथ सांबारी यांनी बॅरिस्टर नाथ पै, प्रा. मधु दंडवते यांची प्रेरणा घेऊन गेले अर्धशतक आचरे पंचक्रोशीची निरपेक्ष वृत्तीने सेवा केली. आचरे गावच्या शैक्षणिक, सामाजिक, भौतिक, अध्यात्मिक, आरोग्यविषयक विकासात श्रीकांत सांबारी यांचा सिंहाचा वाटा आहे. अनेक संस्थांच्या सहकार्याने त्यांनी गेले अर्धशतक आचरे पंचक्रोशीची सेवा केली आहे. आचरे व्यापारी संघटना, श्री साई सेवा मंडळ, दी आचरा प्युपील असोसिएशन, काकड आरती सेवा संघ, इनामदार श्री देव रामेश्वर देवस्थान, आनंद बाल नाट्य मंडळ, माणिक क्रिकेट क्लब आदी विविध संस्थांवर विविध पदांवर त्यांनी सेवा बजावली आहे.
आचरे प्रभागाचे जि.प. सदस्य म्हणून कार्य करीत असताना त्यानी विविध कामे मार्गी लावली. सध्या ते श्री देव रामेश्वर वैभवशाली पतपेढीचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. श्री देव रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिराचे गेली 15 वर्षे अध्यक्ष असून त्या वाचनालया मार्फत विविध समाजसेवी उपक्रम राबविले आहेत. श्री श्रीकांत रघुनाथ सांबारी यांच्या गेल्या अर्धशतकाच्या समाजसेवेचा विचार करून बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण या संस्थेने या वर्षी बॅ. नाथ पै शताब्दी वर्षात त्यांचा मधु वालावलकर पुरस्कार देऊन सन्मान करण्याचे ठरवले आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)