राष्ट्रवादी काँग्रेस मालवणच्या शहर अध्यक्षपदाची धुरा सतिश आचरेकर यांच्याकडे ;जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी जाहीर केली निवड.
मालवणमधील राष्ट्रवादी काॅन्ग्रेसमध्ये चैतन्याची लहर..!
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरच्या राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्षपदाची जबाबदारी युवा सामाजीक कार्यकर्ते सतीश आचरेकर यांच्याकडे देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी ही निवड मालवणच्या बैठकीत जाहीर केली. मालवणातील ही बैठक तालुका राष्ट्रवादी क्राँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
या बैठकीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते काका कुडाळकर, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष बाळ कनयाळकर, तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे, माजी उपसभापती नाथ मालोंडकर, प्रमोद कांडरकर, संदेश फाटक, माजी पंचायत समिती सदस्य विनोद आळवे, सुधीर धुरी, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सदानंद मालंडकर, सलीम खान, अशोक पराडकर, बाबी वायंगणकर, विनोद जाधव, अभी घाडीगांवकर, प्रकाश भोसले, नामदेव गिरकर, हरिश्चंद्र परब, तुळशीदास चव्हाण, ॲड. सदफ खटखटे यांच्यासह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)