ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
देशातील प्रत्येक नवजात बालक हा डोक्यावर ५५,००० रुपयांचे कर्ज घेऊन जन्मतोय : श्री.मनोज खाडये

देशातील प्रत्येक नवजात बालक हा डोक्यावर ५५,००० रुपयांचे कर्ज घेऊन जन्मतोय : श्री.मनोज खाडये

प्रकाशन: 31 Mar 2022 07:49 AM
वाचन संख्या 77

भारतातील धर्मनिरपेक्ष लोकशाही जगात सर्वात अपयशी असल्याची मालवणच्या हिंदू जनजागृती समितीच्या सभेत केली टीका….!

मालवण | सुयोग पंडित : मालवणच्या मामा वरेरकर नाट्यगृहात धर्म शिक्षण ,धर्म जनजागृती व हिंदू संघटन यासाठी हिंदू जनजागृती समितीचा विशेष कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.
यात समितीचे समन्वयक आणि श्री तुळजाभवानी मंदिर संरक्षण समितीचे सदस्य श्री मनोज खाडये यांनी उपस्थितांना प्रमुख वक्ता म्हणून संबोधीत केले.

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन प्रमुख वक्ता श्री.मनोज खाडये यांनी त्यांच्या मुख्य भाषणाला सुरवात केली.

आपल्या भाषणात श्री मनोज खाडये म्हणाले की देशाची आजची स्थिती ही 42 व्या घटनादुरुस्तीची फळं आहेत. आजच्या घडीला भारत देशातील लोकशाही ही सर्वात अपयशी लोकशाही आहे. आजच्या घडीला भारतात जन्म घेणारा प्रत्येक बालक हा दरडोई ५५,००० रुपयांचे कर्ज डोक्यावर घेऊन येतोय.ॠषी मुनींच्या काळातील व भूमीतील शून्य टक्के असणारे नक्षलवाद व महागाईचा टक्का आज कितीतरी पट वाढलेला आहे. १९४७ साली जो एक डाॅलर एका रुपयात यायचा तो आज ७६ रुपयांएवढा झालाय यावरुन रुपयाचे व देशाचे झालेले अवमूल्यन लक्षात येते. एका ईस्ट इंडिया कंपनीला चले जाव जरुर केलंय पण देशात आज ३००० पेक्षा जास्त मल्टिनॅशनल कंपन्या हलाल अर्थव्यवस्थेसह सर्वसाधारण लोकांचे व अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडून टाकतायत. दर चौदाव्या मिनिटाला एक बलात्कार व त्र्याण्णवाव्या व्या मिनिटाला एका स्त्रिचा खून होतोय ही आकडेवारी स्त्री किती असुरक्षित आहे हेच दर्शवते.
लालबहाद्दूर शास्त्रींच्या घोषणेच्या अगदी विरुद्धची स्थिती ‘मर जवान..मर किसान’ आज आहे असे खाडये म्हणाले.

दिल्लीतील निर्भया हत्याकांडातील आरोपींना फाशी न देण्याची मागणी करणारेही देशातिल राजकीय पक्षांत व जनमानसात आहेत यासारखे दुर्दैव नाही.
छत्रपतींनी ज्याप्रमाणे केवळ सात तासात स्त्रीबद्दलच्या गैरवर्तनाबद्दल गावच्या पाटलाचे हात तोडायची शिक्षा दिलेली तो समाज विचार व ती सामाजिक जरब आज नाहिशी झाली आहे.

ज्या देशात नोंदणीकृत अशा 98 कोटी देशी गायी होत्या..ज्यांच्या उपयुक्ततेसकट त्यांना आपण आपली माता मानतो तिथे आज त्यांची संख्या 75000 इतकीही नसणे व त्याबद्दल जराही खंत नसणारे कसे काय आपले बांधव असू शकतील हा विचार करणे ही काळाची गरज आहे.

72 तासांपूर्वी बंगालमध्ये काही हिंदूंना जाळून मारण्यात आलेय त्याबद्दल कोणी काहीच बोलत नाहीय.
हिंदू समाज भव्य दिव्य करत नाही हा दोष नाही तर कुवतीतलही करत नाही.
राज्यकर्ते मंदिरांना लुटतायत.
तुळजा भवानी मंदिर संरक्षण समितीने मिळवलेल्या माहितीनुसार मंदिरातील दान स्वरुपात आलेले 240 किलो दागिने गायब आहेत.

सगळेच मुसलमान दहशतवादी नसतात तर सगळे दहशतवादी मुसलमान असतात हे समिकरण आज स्पष्ट आहे.त्यामुळे जिल्ह्याबाहेरील मुसलमानांना जिल्ह्यात येऊ देताना लव्ह जिहाद या गोष्टीचा अर्थ समजून घेणे व देणे आपले कर्तव्य आहे असे खाडये म्हणाले.

पोलिस,प्रशासन वगैरेंनी हिंदू जनजागरण समितीच्या सदस्यांना भडकाऊ भाषण करु नका,दुसर्या धर्माविरुद्ध बोलू नका हे सांगायची आवश्यकता नाही कारण कोणी येऊन समजवावे असा हिंदू धर्मच नाही. वर्चस्ववादासाठी हिंदू धर्म नसल्यामुळे सत्तेत येणे व जाणे हे उद्देश ठेवून हिंदू जनजागृती समितीची स्थापना http://localhost/news/public/uploads/2002 साली झाली नाही. केवळ धर्मशिक्षण आणि धर्मजागृती होत भारतातील व जगातील हिंदू सुरक्षित व संघटीत रहावा यासाठी http://localhost/news/public/uploads/2002 साली चिपळूण येथे सुरु झालेले संघटनेचे कार्य कुठल्याही पक्षाच्या झेंड्याशिवाय 190 देशात चालत असल्याचे प्रतिपादन मनोज खाडये यांनी केले.

कुठल्याच राजकीय पक्षाला समर्थन देण्यासाठी हिंदू जनजागरण समिती कार्यरत नाही आणि आपले मागण्या व मुद्दे संविधानिक मार्गाने पुढे नेण्यासाठी समितीला संख्या बळाची आवश्यकता नाही. राजकीय पक्षांना धर्मांची गरज भासतेय व ही स्थिती सर्वांनी लक्षात घ्यावी.

या दरम्यान त्यांनी देशातील तटस्थ मिडियावर देखील टीका केली. जग तिसर्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असताना तटस्थता कामाची नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणुक लढवताना एका साध्या नगरसेवकाची स्थिती काय असते हे सगळे जाणतातच तर इतर सरकारी पदांचे काय असेल ते मालवणवासियांना सांगायची आवश्यकता नाहीच असा टोलाही त्यांनी लगावला.छोट्या चारधाम यात्रेकरुंवरील अधिभार बंद केल्याबद्दल उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व विजयदुर्ग किल्ल्याचा प्रश्न विधानसभेत तारांकीत प्रश्न म्हणून मांडल्याबद्दल आमदार वैभव नाईक यांचीही त्यांनी प्रशंसा केली.आपल्या धार्मिक कल्पना व चाली रिती यांचे वैज्ञानिक महत्व व साधनेची महती प्रत्येकाने समजून घ्यायचा आग्रह त्यांनी केला.या कार्यक्रमा दरम्यान सनातन संत आणि हिंदू जनजागरण समितीच्या काही उल्लेखनीय व्यक्तिंचे स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाला मालवणचे स्थानिक अनिकेत फाटक, संदीप भोजणे, श्री व सौ. श्रीधर काळे, श्री. सकपाळ, श्री. चेतन सकपाळ, नगरसेवक श्री.मंदार केणी,आचरे यशराज प्रेरणा गृपचे संस्थापक मंदार सरजोशी, श्री.विलास निव्हेकर, सौ.नमीता गांवकर, श्री.विलास निव्हेकर , विलास हरमळकर, श्री.कुमठेकर, प्रणित मांजरेकर, श्री.पृथ्विराज ऊर्फ बाबी जोगी, सावंतवाडीचे श्री संदेश गावडे, हिंदू जनजागरण समितीचे बहुसंख्य सदस्य,गुजराती बांधव ,मालवणचे पत्रकार व इतर स्थानिक मान्यवर व नागरीक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स