उन्हाची तीव्रता लक्षात घेवून जिल्ह्यातील शाळांच्या वेळा पूर्ववत ठेवाव्यात..
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारतीची मागणी..
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिन्ह्यातील प्राथमिक शाळांची वेळ पूर्वीप्रमाणे ७.२० ते ११.३० करावी अशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या वतीने आग्रही मागणी मुख्यकार्यकारी अधिकारी श्री प्रजित नायर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.राजेंद्र पराडकर,शिक्षणाधिकारी श्री महेश धोत्रे यांची भेट घेवून केली आहे.यावेळी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष श्री संतोष पाताडे, जिल्हा महिला सचिव श्रीमती वैशाली गर्कल,जिल्हा प्रतिनिधी श्री. लहू पाटील, श्री.सिद्धार्थ नेरूरकर,मालवण तालुकाध्यक्ष श्री संतोष कोचरेकर, दोडामार्ग सचिव श्री.सखाराम झोरे,श्री नागेश जाधव,श्री सागर कुराडे,श्री. विकास कपाटे उपस्थित होते.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शाळा उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने सध्या सकाळी ७.२० ते ११.३० या वेळात भरत आहेत. मुख्यकार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग यांच्या२९/०३/२०२२ च्या आदेशानुसार अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी प्राथमिक शाळांची वेळ दिनांक ३१/०३/२०२२ पासून सकाळी ०७.१० ते १२.३० अशी बदलण्यात आली आहे.सदरची बदललेली वेळ ही विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक दृष्टिने गैरसोयीचे आहे असे संघटनेने निवेदन देत स्पष्ट केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश शाळा डोंगराळ भागात आहेत . विद्यार्थी ३ ते ४ किमी अंतर पायपीट करून शाळेत येतात अशापरिस्थितीत विद्यार्थी सकाळी ७.१० वाजता शाळेत पोहोचणे अशक्य आहे,तसेच दुपारी१३.३० नंतर घरी जाताना कडक उन्हामुळे विद्यार्थ्यांना उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. तसेच निर्जन पायवाटेने दुपारच्या वेळी घरी जाताना जीवितास धोका संभवू शकतो. कोविडच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्ष विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहपासून दूरअसल्याने आ ७.१० ते दुपारी १२.३० पर्यंत विद्यार्थी मानसिकदृष्ट्या शाळेमध्ये अध्ययन करू शकण्यास समर्थ नाहीत. तसेच जिल्ह्यातील बहुतांशी शाळांमध्ये धान्य पुरवठा झाला नसल्याने शालेय पोषण आहार सुरु झाला नसल्याने विद्यार्थी उपाशीपोटी अध्ययन करू शकणार नाहीत. सन २०२१-२२शैक्षणिक वर्ष १५ जून पासून सुरू झालेले आहे त्यावेळी निर्गमित केलेल्याआदेशामध्ये शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षण,गृहभेटी तसेच वाड्या वस्त्यांवर जाऊन अध्यापन सुरु ठेऊन नियोजित अभ्यासक्रम पूर्ण केलेला असल्याने जादा वेळ शाळा घेण्याची आवश्यकता वाटत नाही. म्हणून सिंधुदुर्ग जिन्ह्यातील प्राथमिक शाळांची वेळ पूर्वीप्रमाणे ७.२० ते ११.३० करावी अशी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या वतीने आग्रही मागणी मुख्यकार्यकारी अधिकारी श्री प्रजित नायर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.राजेंद्र पराडकर,शिक्षणाधिकारी श्री महेश धोत्रे यांची भेट घेवून केली आहे.तसेच समग्र शिक्षा अनुदान २०२१/२२ PFMS प्रणालीद्वारे खर्च होण्यास अडचणी निर्माण होत असल्याने खर्च करण्यास मुदतवाढ मिळावी,अशी मागणी करण्यात आली आहे,अशी माहिती जिल्हाध्यक्ष श्री.संतोष पाताडे यांनी दिली
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)