ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आज वैभववाडीत नगरसेवक रोहन रावराणे आयोजित क्रिकेट स्पर्धेचा थरार..!

आज वैभववाडीत नगरसेवक रोहन रावराणे आयोजित क्रिकेट स्पर्धेचा थरार..!

प्रकाशन: 22 Mar 2022 01:28 AM
वाचन संख्या 312

वैभववाडी |नवलराज काळे : नवनिर्वाचित नगरसेवक रोहन रावराणे यांच्यातर्फे आयोजीत क्रिकेट स्पर्धेचा थरार आज येथील तांबेवाडी मैदानावर अनुभवता येणार आहे.

कोरोना नियमाचे पालन करून सदर सामने खेळविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी निमंत्रण पत्रिकेमध्ये स्पष्ट केले आहे. या सामन्यातील प्रथम बक्षीस 11111 रुपये असून द्वितीय बक्षीस 7777 आहे. व आकर्षक चषक देण्यात येणार आहे.

प्रत्येक सामना हा 6 षटकांचा असेल, खेळाडू हा तालुक्यातील असावा, सामन्याच्या वेळेमध्ये व षटकांमध्ये बदल करण्याचा अधिकार मंडळाकडे राहील. स्पर्धेतील खेळाडूला एका संघातच खेळता येईल, सहभागी संघाने सामन्या आधी पंधरा मिनिटे उपस्थित राहावे, थ्रो गोलंदाज वापरता येणार नाही, अशा प्रकारच्या नियम व अटी असून हे सामने तांबेवाडी येथे खेळविण्यात येणार आहेत. नगरपंचायत निवडणुकीत निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच नगरसेवक रावराणे यांनी ह्या सामन्यांचे आयोजन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स