चिंदर पालकरवाडी प्राथमिक शाळेस 'माझा गांगेश्वर मित्रमंडळाकडून' छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धकृती पुतळा भेट..
चिंदर | विवेक परब : छत्रपती शिवाजी महाराजांचा आज तिथी प्रमाणे शिवजयंती उत्सव अनेक ठिकाणी उत्साहपूर्वक साजरा करण्यात आला. याचेच औचित्य साधत मालवण तालुक्यातील चिंदर पालकरवाडीच्या माझा गांगेश्वर मित्रमंडळाने वाडीतील जि. प. शाळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धकृती पुतळा देणगी दाखल मुख्खाध्यापक शिवानंद सोलापुरे व सह शिक्षक नंदकुमार जुंदळे यांच्याकडे भेट दिला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. दिक्षा विद्याधर पालकर यांनी मंडळातील सर्व सदस्याचे आभार मानले. माझा गांगेश्वर मित्रमंडळ हे विविध क्षेत्रात काम करत असते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)