ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बांदा-नेतर्डे रस्त्यावरील काही ' सुसाटसिंग ' ठरतायत ग्रामस्थांची डोकेदुखी...! (विशेष लक्षवेधी )

बांदा-नेतर्डे रस्त्यावरील काही ' सुसाटसिंग ' ठरतायत ग्रामस्थांची डोकेदुखी...! (विशेष लक्षवेधी )

प्रकाशन: 22 Mar 2022 12:47 AM
वाचन संख्या 85

बांदा | राकेश परब : बांदा नेतर्डे रसत्यावर गेले काही दिवस एक मुद्दा ग्रामस्थांची तथा स्थानिकांची चिंता व डोकेदुखी बनलेला आहे.त्याचीच एक छोटी नकारात्मक झलक काल सोमवारी दुपारी पहायला मिळाली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा-नेतर्डे रस्त्यावर गाळेल येथे भरधाव वेगात खडीची वाहतूक करणारा डंपर रस्त्यालगत काजूच्या झाडावर आदळून अपघातग्रस्त झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.

याठिकाणी रस्ता अरुंद असल्याने काही बेदरकार ‘सुसाटसिंग’ डंपर चालकांच्या वाहतुकीला आवर घालण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांमधून होत आहे.

या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी वाहतूक करणाऱ्या डंपरांची वर्दळ असते. कित्येकदा भरधाव वेगामुळे छोटे-मोठे अपघात झाले आहेत. दुपारी भरधाव वेगात चालकाचा ताबा सुटल्याने डंपर रस्त्यालगत असलेल्या केणी यांच्या काजूच्या झाडावर जाऊन आदळला. यामध्ये काजूचे झाड मुळापासून उन्मळून पडले आहे. सुदैवाने अपघातात जीवितहानी झाली नाही.

या अशा वाहतुकीच्या ‘सुसाटसिंग’ डंपर चालकांना प्रशासन आतातरी नक्कीच आवर घालेल अशी आशा आता स्थानिक करत आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 290

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स