ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
विघ्नहर्ता आपत्कालीन गृपचा सत्कार

विघ्नहर्ता आपत्कालीन गृपचा सत्कार

प्रकाशन: 16 Aug 2021 10:24 PM
वाचन संख्या 45

मालवण | प्रतिनिधी : चिपळूण येथील महापुराच्यावेळी पूरग्रस्तांना स्वयंस्फूर्तीने मदतकार्यात सहभागी होणाऱ्या मालवणातील विघ्नहर्ता आपत्कालीन गृपच्या कार्याची दखल घेऊन भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानच्यावतीने या ग्रुपचे संचालक दामू तोडणकर, सचिन गोवेकर  आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा ह्रदय सत्कार रविवार दि १५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता मालवणच्या स .का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमात या ग्रुपला एक लाख रुपये किमंतीचे साहित्य वितरित केले जाणार आहे.
चिपळूण येथील महापुरात मदकार्यात मालवण मधून स्वयंस्फूर्तीने सहभागी झालेले मालवणातील विघ्नहर्ता आपत्कालीन ग्रुपचे दामू तोडणकर, सचिन गोवेकर आणि त्यांच्या  सर्व सहकाऱ्यांचा  सन्मान करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला मालवणचे तहसीलदार  अजय पाटणे, सी ए अशोक सारंग, डॉ. सुभाष  दिघे, स का पाटीलच्या प्राचार्या डॉ उज्वला सामंत मॅडम,मालवणचे पोलीस निरीक्षक श्री सोनू ओटवणेकर, विजय केनवडेकर,पत्रकार महेंद्र पराडकर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती नगरसेवक गणेश कुशे यांनी दिली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स