ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
लाॅर्डस् मैदानावर भारताचा रोमहर्षक कसोटी विजय...!

लाॅर्डस् मैदानावर भारताचा रोमहर्षक कसोटी विजय...!

प्रकाशन: 16 Aug 2021 11:29 PM
वाचन संख्या 79

दुसर्या कसोटीत भारताची 151 धावांनी झाली सरशी.. लंडन | स्पोर्ट्स ब्यूरो : इंग्लिश दौर्‍यावर गेलेल्या भारतीय संघाने दुसरी कसोटी जिंकून पाच कसोटींच्या मालिकेत 1:0 अशी आघाडी मिळवली आहे. अतिशय अतितटीच्या झालेल्या ह्या सामन्यांत पाचव्या दिवशीचा खेळ सुरु झाला तेंव्हा सामन्याचे पारडे किंचित् इंग्लिश संघाकडे झुकलेले होते. भारतीय संघाच्या तळाच्या शामीचे अर्धशतक (58 धावा) आणि जसप्रीत बुमराहच्या 34 धावांच्या जोरावर चौथ्या डावात भारताने इंग्लंडसमोर 272 धावांचे आवाहन ठेवले होते. शेवटच्या दिवसाच्या साठ षटकांत हे आवाहन पार करणे कठीण असले तरी इंग्लिश संघ हा सामना अनिर्णित राखायचा प्रयत्न करणार असाच क्रिकेट तज्ज्ञांचा एकंदर कयास होता. भारतीय गोलंदाजांनी सलामीच्या जोडीला शून्यावर तंबूत धाडून संघाच्या विजयाची दारे उघडी केली. जो रुट 33 धावा आणि जाॅस बटरलरच्या 25 धावा वगळता आणखी कुठलाच इंग्लिश फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही. जसप्रीत बुमराहने तीन बळी, शामीने एक आणि मोहम्मद सिराजने चार बळी आणि इशांत शर्माने दोन बळी मिळवत भारताला 151 धावांनी विजय मिळवून दिला. तत्पूर्वी पहिल्या डावात के एल राहुलचे शतक आणि दुसर्या डावात अजिंक्य रहाणेच्या 61 धावा ही भारताची वैशिष्ट्ये ठरली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स