ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
सिंधुदुर्ग महाविद्यालयास रोटरी क्लबतर्फे आकर्षक कचरा कुंडी भेट..

सिंधुदुर्ग महाविद्यालयास रोटरी क्लबतर्फे आकर्षक कचरा कुंडी भेट..

प्रकाशन: 16 Aug 2021 10:18 PM
वाचन संख्या 74

मालवण | प्रतिनिधी : रोटरी क्लब, मालवणच्या वतीने मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाला आकर्षक कचराकुंडी देणगी म्हणून देण्यात आली. मालवण येथील डॉ. लिमये हॉस्पिटलच्या वतीने ही देणगी पुरस्कृत करण्यात आली आहे. रोटरी क्लब मालवणचे अध्यक्ष रोटेरियन उमेश सांगोडकर आणि महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. उज्वला सामंत यांच्या हस्ते या कचराकुंडीचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्राचार्य उज्वला सामंत यांनी रोटरी क्लब मालवणचे आभार मानले. यावेळी सुहास ओरसकर,रोटरी क्लब उपाध्यक्ष रतन पांगे अभय कदम, महेश काळसेकर, डॉ. लीना लिमये, डॉ. अजित लिमये, इत्यादी रोटेरियन उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. सुमेधा नाईक, प्रा. बी. एच. चौगुले, प्रा. एच. एम चौगले, प्रा. खोबरे, प्रा. खरात, प्रा. खोत, प्रा. पवार प्रा. हारगिले तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स