मसुरेच्या वैभवी पेडणेकरचा मालवण पंचायत समिती कडून सन्मानकराटे क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्तरावर बजावलेल्या कामगिरीची महिला दिनी घेतली दखल
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर: मालवण तालुक्यातील मसुरे गावची कन्या आणि कुडाळ जुनियर कॉलेज कुडाळ शास्त्र शाखेची इयत्ता बारावीची विद्यार्थिनी वैभवी दत्तप्रसाद पेडणेकर हिने कराटे या खेळात नॅशनल स्तरावर विशेष प्राविण्य मिळविल्याबद्दल महिला बाल विकास विभाग मालवण व पंचायत समिती मालवण यांच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून विशेष गौरव करण्यात आला.
यावेळी मालवण पंचायत समिती सभापती अजिंक्य पाताडे, गटशिक्षणाधिकारी श्री संजय माने, गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव, उपसभापती सतीश परूळेकर, बालविकास प्रकल्प अधिकारी मालवण आदरणीय कौमुदी पराडकर मॅडम,सहाय्यक गटशिक्षणाधिकारी श्याम जाधव, तहसीलदार अजय पाटणे आदी मान्यवर उपस्थित होते. वैभवी हिला यावेळी सन्मानचिन्ह सन्मानपत्र पुष्पगुच्छ देऊन कौमुदी पराडकर यांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. मान्यवरांनी वैभवी पेडणेकर हिच्या अष्टपैलू कामगिरीबद्दल विशेष कौतुक केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)