तुम्ही केलेली मदत वाचवू शकतात एकाचे प्राण. बळीराम जुवेकरला किडनी उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज.
सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्तींकडे कुटुंबीयांची सढळ हस्ते मदतीची मागणी .
चौके |अमोल गोसावी : मालवण तालुक्यातील काळसे गावचा तरुणकु बळीराम गुरुनाथ जुवेकर ( वय ३२ ) हा सध्या मुंबईस वास्तव्यास असून मागील दिड वर्षापासून किडणीच्या आजाराने त्रस्त आहे. आता तर त्याची एक किडणी पूर्णपणे निकामी झाली आहे.
त्याच्यावर नवी मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी बळीरामचा जीव वाचवण्यासाठी तातडीने निकामी किडणी काढून त्याठिकाणी किडणी ट्रान्सप्लांट करून दुसरी किडणी बसवण्याचा पर्याय जुवेकर कुटुंबासमोर ठेवला आहे. या शस्त्रक्रियेसाठी सुमारे 6,50,000/- रुपये खर्च अपेक्षित आहे. स्वतःच्या मुलासाठी बळीरामच्या आईने स्वतःची किडनी देण्याची तयारी दर्शवली आहे. परंतु जुवेकर कुटुंब हे शेतकरी कुटुंब असून त्यांची आर्थिक परिस्थीती जेमतेमच आहे. बळीराम हा घरातील कमावता मुलगा असून आई वडील आणि छोटा भाऊ, आणि छोटी बहीण हे गावी राहून शेती आणि मोलमजुरी करून कशीतरी स्वतःची गुजराण करतात. घरातील कमावता मुलगाच आजारी पडल्याने संपूर्ण कुटुंबावर मोठ संकट कोसळल आहे. अशा बिकट परिस्थितीत जुवेकर कुटूंबीयांना बळीराम चे प्राण वाचवण्यासाठी एवढी मोठी रक्कम उभी करणे अशक्यप्राय आहे. पण समाजातील दानशूर व्यक्ती आणि समाजसेवी संस्था यांनी सढळहस्ते आर्थिक मदत केल्यास. बळीराम वरील शस्त्रक्रिया वेळेत करणे शक्य होईल आणि त्याचा प्राणही वाचेल. म्हणून ज्यांना बळीरामचे प्राण वाचवण्यासाठी आर्थिक मदत द्यायची असेल तर खालील खात्यावर पैसे पाठवावेत किंवा खालील व्यक्तींशी संपर्क साधावा असे कळकळीचे आवाहन करण्यात येत आहे.
स्वप्निल जुवेकर :- 9545730848
नागेश जुवेकर :- 9969028318
=============================
=============================
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)