ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मसुरे परिसरातील निराधार, मूकबधिर  महिला कुटुंबांना बचत गटाचा आधार!

मसुरे परिसरातील निराधार, मूकबधिर महिला कुटुंबांना बचत गटाचा आधार!

प्रकाशन: 08 Mar 2022 09:18 PM
वाचन संख्या 112

पावणाई स्वयंसहाय्यता बचत गटाचा महिलादिनी अनोखा उपक्रम

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर: मसुरे परिसरातील निराधार, मूकबधिर महिला कुटुंबांना येथील पावणाई महिला स्वयं सहाय्यता बचत गट सदस्यांनी महिला दिनाचे औचित्य साधून जीवनावश्यक साहित्य वाटप केले. मसुरे मागवणे येथील निराधार आणि वृद्ध अशा सुशीला मनोहर परब जीवनावश्यक वस्तू आणि कपडे वाटप करत सामाजिक सेवेतील आपला खारीचा वाटा बचत गटाने उचलला. सर्वत्र आज विविध उपक्रमांनी महिला दिन साजरा होताना मात्र खऱ्या अर्थाने सामाजिक भावना जपणाऱ्या मसुरे येथील पावणाई स्वयंसहाय्यता बचत गटाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मसुरे येथील महिला, वेरली येथील एक मूकबधिर महिला कुटुंब आणि आणि लहान वयातच आईचे छत्र हरपलेली आणि वडील अपंग असलेली एक आठ वर्षाची कन्या अशा समाजातील तीन दुर्लक्षित आणि अतिशय परिस्थितीने गांजावलेल्या तीन महिला कुटुंबांना मसूरे येथील पावणाई महिला बचत गटाने महिला दिनाचे औचित्य साधून जीवनावश्यक वस्तू, कपडे याचे त्यांच्या घरी जाऊन वितरण केले. खरं पाहता ग्रामीण भागातील महिला बचत गट म्हणजे आर्थिक परिस्थितीने सुस्थितीत असलेला गट नसतो. परंतु गेले वर्षभर विविध उपक्रमातून या बचत गटाने जे काही तुटपुंजे आर्थिक उत्पन्न मिळविले या उत्पन्नातून त्यांनी समाजातील निराधार अशा अबलाना मदत करण्याचे ठरविले.

या वेळी या बचत गटाच्या अध्यक्षा हेमलता दुखंडे, उपाध्यक्ष नीलम दळवी, सचिव ज्योती पेडणेकर, सदस्य शितल मसुरकर, शाकीर शेख, नुरजहा शेख, मनीषा शिंदे, मोनिका दुखंडे, विजेता वेंगुरलेकर, सुरेखा परब, लक्ष्मी पेडणेकर, आणि या बचत गटाच्या सर्व महिला उपस्थित होत्या.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स