भाजप किसान मोर्चाचा विधान भवनावर सरकारच्या धोरणा विरोधात मोर्चा.
किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत यांच्यासह जिल्हातील १०० शेतकऱ्यांचा सहभाग .
चिंदर | विवेक परब : भाजपा किसान मोर्चाचा विधान भवनावर राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात आज भाजप प्रदेश कार्यालय-मुंबई ते विधान भवन असा मोर्चा, किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष श्री वासुदेव (नाना) काळे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता. भव्य मोर्च्याला राज्य सरकार सामोरे न जाता विधानसभा अधिवेशन सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आले.
या मोर्च्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुमारे 100 शेतकरी सहभागी झाले होते. किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत, मालवण तालुका किसान मोर्चा अध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष श्री किशोर नरे, जिल्हा सरचिटणीस श्री गुरुनाथ पाटील- कुडाळ, किसान मोर्चा मालवण तालुकाध्यक्ष श्री महेश सारंग , जिल्हा चिटणीस श्री अजय सावंत, सावंतवाडी आणि जिल्ह्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)