ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वेंगुर्ले भाजपच्यावतीने तगडा शरीरसौष्ठवपटू अंकित सोनसुरकरचा सत्कार.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

वेंगुर्ले भाजपच्यावतीने तगडा शरीरसौष्ठवपटू अंकित सोनसुरकरचा सत्कार.

प्रकाशन: 06 Mar 2022 11:34 AM
वाचन संख्या 60

चिंदर |‍ विवेक परब : ‘डिपार्टमेंट ऑफ स्पोटर्स अँड फिजीकल एज्युकेशन, मुंबई विद्यापीठ’ आयोजित सि.के.टी.काॅलेज, पनवेल येथे झालेल्या आंतर विद्यापीठ बेस्ट फिजिक शरीरसौष्ठव स्पर्धेत डिपार्टमेंट ऑफ फिजिकल एज्युकेशनचा बी.पी.एड. प्रथम वर्षाचा विद्यार्थी व वेंगुर्लेतील शरीरसौष्ठवपट्टु अंकित किशोर सोन्सुरकर याने ८० कीलो वजनी गटात तृतीय क्रमांक पटकावत सिंधुदुर्गातील पहिला खेळाडू होण्याचा मान मिळवल्याबद्दल भाजपा वेंगुर्लेच्यावतीने त्याचा सत्कार करण्यात आला.

किशोर सोनसुरकर यांच्या सातेरी व्यायाम शाळेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नगराध्यक्ष राजन गिरप व भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य शरद चव्हाण यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला .

यापूर्वीही अंकित सोन्सुरकर याने ज्युनिअर मिस्टर आशिया २०१७ स्पर्धेत बॅंकाॅक – थायलंड येथे ५ वा क्रमांक मिळविला होता. ज्यु.मि.आशिया २०१८ भोपाळ – मध्यप्रदेश येथे सहभागी झाला. त्याने ‘खर्डेकर श्री २०१८’ स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेता तसेच जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत प्राविण्य मिळवले.

पॉवरलिफ्टिंग खेळात राज्यस्तरीय मजल मारली तसेच वेटलिफ्टींग मध्ये जिल्हास्तरीय गोल्ड मेडल प्राप्त केले. आंतर मुंबई युनिव्हर्सिटी बेस्ट फिजिक ८० किलो वजनी गटात तिसरा क्रमांक मिळविला. अशा स्पर्धा गाजवत असताना सामाजिक बांधिलकी म्हणून कोरोनाच्या काळात सातेरी व्यामशाळेच्यावतीने ग्रामीण रुग्णालय वेंगुर्ले येथे गरजु रुग्णांना ऑक्सिजन काॅन्सस्ट्रेटरची अनमोल सेवा उपलब्ध करून देण्यात मोठा पुढाकार घेतला.

अशा अष्टपैलू खेळाडूचा सन्मान भाजपा वेंगुर्लेच्यावतीने करण्यात आला.

यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना (बाळू) देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जि.का.सदस्य साईप्रसाद नाईक, मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर, नगरसेवक प्रशांत आपटे, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, ता उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस, परबवाडा सरपंच पपु परब, किसान मोर्चाचे बाळु प्रभु, अल्पसंख्याक सेलचे सायमन आल्मेडा, सांस्कृतिक आघाडी चे शैलेश जामदार, बुथप्रमुख शेखर काणेकर, ओंकार चव्हाण तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडू किशोर सोनसुरकर, व्यायामशाळा संचालीका सौ.अबोली सोन्सुरकर, राज्य पंच सुधीर हळदणकर, रांगोळीकार पिंटू कुडपकर , रस्सीखेच पंच मनोहर कावले, सिंधुदुर्ग श्री हेमंत चव्हाण, व्यायाम प्रशिक्षक निनाद दिपनाईक, गौतम परब, मोहीत कुमार, वैभव पेठे, साहील बागायतकर,सोहन पोतदार, अभि गावडे, हर्ष मोबारकर, कॅज़िटन डिसोझा, रॅमीज शेख, शुभम गावडे, विक्रांत मठकर, सॅमसंग फर्नांडिस इत्यादी व्यायामपटू उपस्थित होते.

Article image

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स