ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आचर्याच्या सौ. विनिता विवेक कांबळी ठरल्या जिल्हा ग्रंथालय संघाच्या आदर्श ग्रंथपाल..!

आचर्याच्या सौ. विनिता विवेक कांबळी ठरल्या जिल्हा ग्रंथालय संघाच्या आदर्श ग्रंथपाल..!

प्रकाशन: 06 Mar 2022 12:02 PM
वाचन संख्या 79

चिंदर | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि एकूणच ग्रंथालय चळवळीतील उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून ‘आदर्श ग्रंथालय सेवक’ हा सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्यावतीने दिला जाणारा जिल्हास्तरीय पुरस्कार यंदा आचरा सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपाल सौ. विनिता विवेक कांबळी यांना सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त ग्रंथालय संघाच्या रा.व.अनंत शिवाजी देसाई वाचनालय ग्रंथसंग्राहालय यांच्या सभागृहात वार्षिक अधिवेशनात साहित्यिक गजानन कोटीवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

व्यासपिठावर खासदार विनायकजी राऊत, आमदार वैभवजी नाईक, मंगेश मस्के व साहित्यिक उपस्थित होते.

सलग गेली २५ वर्षे वाचकांची ग्रंथपाल म्हणून सेवा करत असलेल्या सौ.विनिता कांबळी या अनेक उपक्रमात हिरहिरीने सहभागी असतात. वाचनसंस्कृती जपण्यासाठी अध्यक्ष, संचालक यांच्यासह त्या नेहमी प्रयत्नशील आहेत. त्यांना मिळालेल्या पुरस्कार बद्दल वाचनालयाचे अध्यक्ष श्रीकांत सांबारी , उपाध्यक्ष बाबाजी भिसळे , कार्यवाह अर्जुन(दादा) बापार्डेकर यांसह साहित्य, सांस्कृतिक व सामाजिक स्तरांतून त्यांची प्रशंसा होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स