ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
सावंतवाडीचा सोहम कोरगांवकर जिल्हयात प्रथम.

सावंतवाडीचा सोहम कोरगांवकर जिल्हयात प्रथम.

प्रकाशन: 04 Mar 2022 03:53 PM
वाचन संख्या 49

शिक्षक समिती जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षा.

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग आयोजित इ ५ वी च्या जिल्हास्तरीय मोफत शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून जिल्हास्तरीय टाॅप 10 गुणवत्ता यादीमध्ये सावंतवाडी चराठे नं 1 शाळेचा कु सोहम बापूशेठ कोरगांवकर प्रथम (गुण 266) आला आहे. मालवणची मसुरे नं 1ची कु यशश्री गुरूनाथ ताम्हणकर(गुण 260)दुसरी आली असून देवगडचा पुरळ हुर्शीचा कु संस्कार संभाजी झांबरे गुण (254)व सावंतवाडी सांगेली सावरवाडचा कु पारस देवदास दळवी (गुण 254) दोघेही तिसरे आले आहेत. तसेच जिल्हास्तरीय टाॅप 10 गुणवत्ता यादीत सावंतवाडीचे 7,मालवणचे 4,कुडाळ देवगड वेंगुर्ला दोडामार्ग या तालुक्यांचे प्रय्येकी एक प्रमाण विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग ने दिली आहे.
शिक्षक समिती सिंधुदुर्ग च्या जिल्हास्तरीय इ 5 वी शिष्यवृत्ती सराव परीक्षेला एकूण http://localhost/news/public/uploads/2070 विद्यार्थी बसलेले होते. यामधून जिल्हास्तरीय टाॅप 10 गुणवत्ता यादी तयार करण्यात आली असून नावे पुढीलप्रमाणे – कु शादुल गोठोसकर कांदुळी कुडाळ (गुण 250)व कु जान्हवी पाटील कुंभवडे दोडामार्ग गुण 250 दोघेही चौथ्या क्रमांकावर, कु कोमल राणे कांदळगाव मालवण (गुण 248) व कु मुक्ता काळसेकर नांदरूख आमडोस मालवण( गुण 248) दोघेही पाचव्या क्रमांकावर, कु अक्षरा राऊळ शिरशिंगे सावंतवाडी गुण (244) व कु किमया परब बांदा नं 1 सावंतवाडी (गुण 244) दोघेही सहाव्या क्रमांकावर, कु कनिष्का राजन तेली बांदा नं 1 सावंतवाडी गुण 238 सातव्या क्रमांकावर, कु शंभू पांढरे निरवडे कोणापाल सावंतवाडी( गुण 236)आठव्या क्रमांकावर, कु हर्षाली सुरवसे मठ नं 1 मालवण (गुण 234) नवव्या क्रमांकावर तर कु अथर्व मौर्ये सोनुली सावंतवाडी (गुण 232)व कु लावण्या राणे वजराठ नं 1 वेंगुर्ला (गुण 232) आदी विद्यार्थ्यांचा समावेश झाला आहे.
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे, पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे शिक्षक समिती जिल्हाशाखा सिंधुदुर्ग च्यावतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यासात येत आहे.

लवकरच या ‘टाॅप 10’ गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांंचे गुणगौरव कार्यक्रम आयोजित केला जाणार असल्याचे जिल्हाध्यक्ष नितीन कदम व जिल्हासरचिटणीस सचिन मदने यांनी स्पष्ट केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स