ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
वैभवी दत्तप्रसाद पेडणेकर हिला 'भंडारी समाजरत्न' हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

वैभवी दत्तप्रसाद पेडणेकर हिला 'भंडारी समाजरत्न' हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर.

प्रकाशन: 04 Mar 2022 04:23 PM
वाचन संख्या 45

मुंबई मुलुंड येथे 6 मार्च रोजी भंडारी समाजाच्या मान्यवरांच्या हस्ते होणार वितरण..

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मसुरे गांवची कन्या आणि कुडाळ जुनियर कॉलेज कुडाळ विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कुमारी वैभवी दत्तप्रसाद पेडणेकर हिला भंडारी एकीकरण समिती या देश पातळीवर ते काम करणाऱ्या समितीच्या वतीने राज्य स्तरीय भंडारी समाजरत्न पुरस्कार http://localhost/news/public/uploads/2022 जाहीर झाला आहे. याचे वितरण रविवार दिनांक 6 मार्च रोजी राजे संभाजी सांस्कृतिक सभागृह मुलुंड पूर्व येथे होणार आहे.


वैभवी पेडणेकर हिने आज तागायत कराटे, नृत्य, क्रीडा, समाजसेवा, गरीब विद्यार्थी दत्तक, विविध सांस्कृतिक कार्यक्रम सहभाग, तसेच कला, क्रीडा, सामाजिक,साहित्य आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये गुणवान कामगिरी केली आहे. कराटे आणि महिला दशावतार ही कला देश पातळीवर ती नेण्यासाठी मोलाची कामगिरी केली होती. या कार्याची दखल देश पातळीवर ती काम करणाऱ्या भंडारी समाजाच्या भंडारी एकीकरण समिती ने घेऊन वैभवी पेडणेकर इला भंडारी समाज रत्न पुरस्कार http://localhost/news/public/uploads/2022 जाहीर केला त्याचे वितरण रविवार दिनांक सहा मार्च दोन हजार बावीस रोजी सकाळी 11 वाजता राजे संभाजी सांस्कृतिक सभागृह मुलुंड पूर्व येथे होणार आहे. भंडारी समाजाच्या विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण होणार आहे. वैभवी पेडणेकर हिला मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

अतिशय युवा वयात वैभवीचा सर्वच क्षेत्रातील वैचारिक दृष्टीकोनाबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व स्तरांवर ती नेहमीच प्रशंसेचा विषय ठरते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स