सिंधुदुर्ग जिल्ह्यात सत्यवान यशवंत रेडकर यांची निःशुल्क स्पर्धा परीक्षा व्याख्याने .
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड व कुडाळ तालुक्यात ५ व ६ मार्च http://localhost/news/public/uploads/2022 रोजी निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्याने आयोजित केली गेली आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूमिपुत्र तिमिरातुनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते, श्री. सत्यवान यशवंत रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार हे प्रमुख मार्गदर्शक स्वरूपात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.व्याख्यान वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. शनिवार, दिनांक ५ मार्च २०२२१) यशवंतराव राणे माध्यमिक विद्यालय, बापर्डे, ता.देवगड, सकाळी ९.०० वाजता२) एस. बी. राणे हायस्कूल नारिंग्रे, ता. देवगड, दुपारी १.०० वाजताब) रविवार, दिनांक ६ मार्च २०२२१) सेमिनार हाॅल, संत राऊळ महाराज महाविद्यालय, ता. कुडाळ, सकाळी ९.३० वाजता२) पु.प्रा.शाळा बुडक्याचीवाडी, मुळदे-खुटवळवाडी रोड, ता.कुडाळ, दुपारी १.३० वाजताजास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या नि:शुल्क मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा व ९९६९६५७८२० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)