ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वेंगुर्ले भाजपा महिला मोर्चाच्या वतीने महिला दिनी होम मिनीस्टर  खेळ पैठणीचा  स्पर्धेचे आयोजन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

वेंगुर्ले भाजपा महिला मोर्चाच्या वतीने महिला दिनी होम मिनीस्टर खेळ पैठणीचा स्पर्धेचे आयोजन.

प्रकाशन: 03 Mar 2022 07:33 PM
वाचन संख्या 59

चिंदर | विवेक परब : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च रोजी सायंकाळी ४:०० वाजता साईमंगल कार्यालय , वेंगुर्ले येथे ‘होममिनीस्टर – खेळ पैठणीचा’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील प्रथम पाच विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार असून प्रथम पारितोषिक पैठणी तसेच इतरांना सोन्याची नथ व गृहपयोगी वस्तु बक्षीस स्वरुपात देण्यात येणार आहेत.महिला दिनाच्या निमित्ताने महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. तसेच ” चुल व मुल “या कक्षेतुन बाहेर पडून महिलांना एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी भाजपा महिला मोर्चा, वेंगुर्लेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे महिला तालुका अध्यक्षा स्मिता दामले यांनी सांगितले.महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक तालुका कार्यालयात आयोजित करण्यात आली होती . यावेळी जिल्हा उपाध्यक्ष ॲड सुषमा खानोलकर, उपनगराध्यक्षा कु शितल आंगचेकर, महीला मोर्चा जि. सरचिटणीस सारीका काळसेकर, शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर, महिला ता.सरचिटणीस व्रुंदा गवंडळकर, माजी नगराध्यक्षा डाॅ. पुजा कर्पे, नगरसेविका कृपा मोंडकर ), ग्रामपंचायत सदस्या सौ लक्ष्मी परब व गार्गी राऊळ, किर्तीमंगल भगत, रसीका मठकर व आकांक्षा परब इत्यादी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

Article image

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स