ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मालवणचा गणेश सातार्डेकर ठरला पश्चिम महाराष्ट्र श्रीच्या ५५-६० किलो वजनी गटाचा जेता...!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मालवणचा गणेश सातार्डेकर ठरला पश्चिम महाराष्ट्र श्रीच्या ५५-६० किलो वजनी गटाचा जेता...!

प्रकाशन: 03 Mar 2022 03:03 PM
वाचन संख्या 659

द फिटनेस वाॅरिअर जीमचा खेळाडू…!

मालवण | प्रतिनिधी : कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या पश्चिम महाराष्ट्र शरीर सौष्ठव स्पर्धेत सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर असोसिएशनच्या वतीने मालवण येथील ‘द फिटनेस वॉरियर जिम’ चा खेळाडू गणेश सातार्डेकर याने ५५-६० किलो वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावला. त्याला रोख रक्कम, चषक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले .

सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर असोसिएशन च्या वतीने जिल्ह्यातील शरीर सौष्ठव खेळाडूंना राज्य स्पर्धेचा अनुभव यावा म्हणून जिल्हा संघटनेच्या वतीने ‘गो फॉर गोल्ड’ हा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये जिल्ह्यातील टॉप बॉडी बिल्डर्सना घेऊन राज्य स्पर्धेत सहभागी करून व्यासपीठ देण्याचा प्रयत्न आहे. या उपक्रमाची सुरुवात सुवर्ण पदक मिळवून गणेश सातार्डेकर याने केली.

नवीन बॉडी बिल्डर्सना प्रोत्साहित केले. या बद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येही आता अशा शरीर सौष्ठव स्पर्धा आयोजीत होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहेत.सिंधुदुर्ग जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशन गो फॉर गोल्ड उपक्रम, सिंधुदुर्ग संघ व्यवस्थापक श्री.सुधीर हळदणकर, मालवण तालुका अध्यक्ष श्री. रुपेश सातार्डेकर, जिल्हा संघटना सदस्य श्री.उमेश कोदे , सचिव आंतर राष्ट्रीय खेळाडू श्री.किशोर सोन्सुरकर यांनी विशेष अभिनंदन केले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स