ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आय.पि.एल.महालिलावाची बोली पुकारणारे ह्यू एडमेडस यांना आय.पि.एल.लिलावादरम्यान आली चक्कर…!

आय.पि.एल.महालिलावाची बोली पुकारणारे ह्यू एडमेडस यांना आय.पि.एल.लिलावादरम्यान आली चक्कर…!

प्रकाशन: 12 Feb 2022 02:53 PM
वाचन संख्या 113

क्रिडावृत्त | सुयोग पंडित : बेंगळुरु येथे http://localhost/news/public/uploads/2022 आय.पि.एल. महालिलाव चालू असताना दरम्यान एक वेगळीच घटना घडल्याने महालिलावाची प्रक्रिया काहीकाळ स्थगित करुन दुपारच्या भोजनाच्या सत्राची घोषणा केली गेली.
महालिलावाची बोली पुकारणारे इंग्लंडचे ह्यू एडमेडस यांना बोली पुकारण्याच्या प्रक्रिये दरम्यान अचानक चक्कर आली. सुमारे तीन तास सलग बोली लावण्याच्या मॅरॅथॉन वाक्चातुर्यानंतर त्यांना शारिरीक शीण आल्याने त्यांना भोवळ आली असावी असा प्राथमिक कयास असून ह्यू एडमेडस हे आता शुद्धीवर असून त्यांच्या प्रकृतीच्या चिंतेची काळजी नसल्याचे डाॅक्टर्सनी सांगितले असल्याचे सूत्रांच्या आधारे समजते. दुपारी 03:30 वाजता महालिलाव पुन्हा एकदा सुरु होईल.
आय.पि.एल.च्या महालिलावात आत्तापर्यंत मुंबई इंडिअन्स व सनरायझर्स हैद्राबाद वगळता सर्व संघांनी खेळाडू खरेदीचे खाते उघडले आहे. लखनौ व अहमदाबाद या दोन नविन संघांचा या महालिलावात नव्यानेच प्रवेश झालेला असून आत्तापर्यंत http://localhost/news/public/uploads/20 खेळाडूंची विविध संघांना विक्री झालेली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स