ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
वायरीतील मोबाईल आधार कार्डला लिंक करण्याचे शिबिर उस्फूर्त प्रतिसादात संपन्न..!

वायरीतील मोबाईल आधार कार्डला लिंक करण्याचे शिबिर उस्फूर्त प्रतिसादात संपन्न..!

प्रकाशन: 12 Feb 2022 01:02 PM
वाचन संख्या 93

मालवण | विनीत मंडलीक  : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका तृप्ती मयेकर यांच्या संकल्पनेतून आणि माजी नगरसेविका सेजल परब व माजी  नगरसेवक पंकज सादये यांच्या सहकार्याने वायरी येथील ‘शांताराम निवास’ या ठिकाणी मोबाईलक्रमांक आधार कार्डला लिंक करण्याचे शिबीर आयोजित करण्यात आले होते.


या शिबिराला वायरी व प्रभाग क्रमांक 8च्या नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
या शिबिरात ऐंशी नागरिकांनी आधारकार्डला मोबाईल क्रमांक लिंक करून घेतला त्याच प्रमाणे काहींना त्यांचा  जुना मोबाईल क्रमांक बदलून  नवीन क्रमांक अपडेट करून देण्यात आला.
ज्या नागरिकांना आपल्या घरातून बाहेर पडता येत नाही अश्या नागरिकांना घरी जाऊन त्याचा मोबाईल क्रमांक  लिंक करून दिला गेला .


हे शिबीर यशस्वी करण्यासाठी पोस्ट कर्मचारी श्री  अमोल माळकर( बागायत पोस्ट) ,कुमारी प्राची माळकर (देवबाग पोस्ट), आणि  श्री विजय तरी (वायरी पोस्ट ) यांनी मोलाचे सहकार्य केले.त्याबद्दल त्यांचे ही नागरिकांनी व शिबिर आयोजकांनी  आभार मानले.
माजी नगरसेविका तृप्ती मयेकर व सहकार्यांचीही उपस्थित  नागरीकांनी प्रशंसा केली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स