ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
विघ्नहर्ता आपत्कालीन ग्रुपचा ह्रदय सत्कार आयोजित
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

विघ्नहर्ता आपत्कालीन ग्रुपचा ह्रदय सत्कार आयोजित

प्रकाशन: 14 Aug 2021 03:28 PM
वाचन संख्या 52

मालवण | प्रतिनिधी : चिपळूण येथील महापुराच्यावेळी पूरग्रस्तांना स्वयंस्फूर्तीने मदतकार्यात सहभागी होणाऱ्या मालवणातील विघ्नहर्ता आपत्कालीन ग्रुपच्या कार्याची दखल घेऊन भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानच्यावतीने या ग्रुपचे संचालक दामू तोडणकर, सचिन गोवेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा ह्रदय सत्कार रविवार दि १५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता मालवणच्या स .का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमात या ग्रुपला एक लाख रुपये किमंतीचे साहित्य वितरित केले जाणार आहे.

चिपळूण येथील महापुरात मदकार्यात मालवण मधून स्वयंस्फूर्तीने सहभागी झालेले मालवणातील विघ्नहर्ता आपत्कालीन ग्रुपचे दामू तोडणकर, सचिन गोवेकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला मालवणचे तहसीलदार अजय पाटणे, सी. ए. अशोक सारंग, डॉ. सुभाष दिघे, स. का. पाटीलच्या प्राचार्या डॉ. उज्वला सामंत मॅडम,मालवणचे पोलीस निरीक्षक श्री सोनू ओटवणेकर, विजय केनवडेकर,पत्रकार महेंद्र पराडकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती नगरसेवक गणेश कुशे यांनी दिली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स