ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
स्वातंत्रदिनी १३० अधिक उपोषणे हे सत्ताधाऱ्यांचे अपयश
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

स्वातंत्रदिनी १३० अधिक उपोषणे हे सत्ताधाऱ्यांचे अपयश

प्रकाशन: 14 Aug 2021 04:05 PM
वाचन संख्या 42


परशुराम उपरकर : लोकप्रतिनिधींना जनतेच्या प्रश्‍नापेक्षा मलिदा खाण्यात इंटरेस्ट

कणकवली / उमेश परब – सिंधुदुर्गातील सर्वच पक्षाच्या लोकप्रतिनिधींना जनतेचे प्रश्‍न सोडविण्यापेक्षा जनतेचा पैसा आणि टक्‍केवारीतील मलिदा खाण्यामध्येच अधिक इंटरेस्ट आहे. जनतेचे प्रश्‍न सुटत नसल्‍याने उद्याच्या स्वातंत्र्यदिनी सिंधुदुर्गनगरीत तब्‍बल १३० पेक्षा अधिक नागरिक उपोषणाला बसणार आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने नागरिकांची उपोषणे होत असतील तर हे जिल्ह्यातील सत्ताधारी आणि लोकप्रतिनिधींचे अपयश आहे अशी टीका मनसेचे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी आज केली.
येथील मनसे संपर्क कार्यालयात श्री.उपरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्‍हणाले, सिंधुदुर्गवासीयांचे अनेक प्रश्‍न प्रलंबित आहेत. त्‍यांची सोडवणूक करण्याऐवजी जिल्ह्यातील सत्ताधारी-विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्‍यारोप करत आहेत. खोटं बोला पण रेटून बोला या उक्‍तीप्रमाणे न झालेल्‍या विकासकामांचेही श्रेय सत्ताधारी-विरोधक घेत आहेत. जिल्ह्यातील उमेदवारांना डावलून जिल्ह्यात परजिल्ह्यातील उमेदवारांची भरती होते. तरीही हे लोकप्रतिनिधी आवाज उठवत नाहीत हे जिल्‍हावासीयांचे दुदैव आहे.
श्री.उपरकर म्‍हणाले, जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्‍य केंद्रे, शासकीय रूग्‍णालयांमध्ये कंत्राटी वैद्यकिय अधिकारी जीव तोडून काम करत आहेत. मात्र त्‍यांना तीन महिन्याचा पगार मिळालेला नाही. दुसरीकडे एनआरएचएम अंतर्गत सरकारी रूग्‍णालयात नियुक्‍त झालेले खासगी डॉक्‍टर्स रूग्‍णांची तपासणी न करताच सरकारचा निधी लाटत आहेत. काही डॉक्‍टर्स तर आपल्‍या खासगी रूग्‍णालयातील रूग्‍ण सरकारी रूग्‍णालयांमध्ये आणून त्‍यांची तपासणी करत आहेत. पण याविरोधात कुठलाही लोकप्रतिनिधी बोलत नाही. कारण या लोकप्रतिनिधींना जनतेच्या प्रश्‍ना पेक्षा मलिदा खाण्यातच इंटरेस्ट आहे.
कळणे मायनियंग प्रकल्‍पामुळे अनेक संसाराची वाताहात झाली. तरीही अप्पर जिल्‍हाधिकारी मायनिंग वाल्‍यांना सहकार्याची भूमिका घेतात. कळणे मायनिंग कायम स्वरूपी बंद व्हायला हवे. पण त्‍याबाबतही सत्ताधिकारी आणि विरोधक कुठलीही ठोस भूमिका घेत नाहीत. विकासापेक्षा भ्रष्‍टाचार करण्याकडेच हे लोकप्रतिनिधी प्राधान्य देत असल्‍याचा आरोप श्री.उपरकर यांनी केला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स