ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
नंदकिशोर साळसकर यांचा ओरोस येथील सामाजिक न्यायभवन येथे सेवनिवृत्तीपर सत्कार

नंदकिशोर साळसकर यांचा ओरोस येथील सामाजिक न्यायभवन येथे सेवनिवृत्तीपर सत्कार

प्रकाशन: 14 Aug 2021 03:21 PM
वाचन संख्या 103

नंदकिशोर साळसकर हे शांत व शिस्तप्रिय कार्यतत्पर तसेच समाजप्रिय व्यक्तिमत्वाचे

जिल्हा जात पडताळणी समितीचे उपायुक्त प्रमोद जाधव यांचे प्रतिपादन

शिरगाव | संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील साळशी गावचे सुपुत्र असलेले नंदकिशोर साळसकर हे श्यामराव पेजे,इतर मागासवर्ग आर्थिक विकास मंडळाचे जिल्हाव्यवस्थापक म्हणून त्यांनी अतिशय चांगल्याप्रकारे काम केले.अतिशय शांत, शिस्तप्रिय,कार्यतत्पर म्हणून त्यांची ओळख आहे.शासकीय सेवेत असताना त्यांनी समाजाभिमुख काम केले.समाजातील गरजू लोकांसाठी,अपंगांसाठी त्यांचे काम उल्लेखनीय आहे. गेली ३० वर्षे शासकीय सेवेत असताना त्यांनी समाजासाठी खूप काही केले.असच त्यांनी भविष्यातही करत रहावे.असे जिल्हा जात पडताळणी समितीचे उपआयुक्त प्रमोद जाधव यांनी बोलताना व्यक्त करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
श्यामराव पेजे,कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ(मर्या.) ओरोस चे जिल्हा व्यवस्थापक नंदकिशोर साळसकर यांचा सेवनिवृत्तीपर सत्कार ओरोस येथील सामाजिक न्यायभवनात आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.यावेळी श्री साळसकर यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी समाजकल्याण सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर,जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री पवार,लेखाधिकारी श्री थोरात, शाहू प्रतिष्ठानचे बालाजी सुरवसे,आदींसह विविध विभागातील अधिकारी,महामंडळाचे समन्वयक उपस्थित होते.
यावेळी जयंत चाचरकर म्हणाले की,नंदकिशोर साळसकर हे उमदे आणि प्रसन्न व्यक्तीमत्वाचे असून कुठलेही काम ते तळमळीने आणि जबाबदारीने करत लोकांच्या समस्या सोडविण्याचे त्यांनी काम केले.असे सांगितले.
यावेळी नंदकिशोर साळसकर यांच्या कल्पनेतून समाजातील सर्वांना शासकीय योजना कुठल्या?त्यांची माहिती मिळावी यासाठी शाहू प्रतिष्ठान यांच्यावतीने छपाई करण्यात आलेल्या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशनही करण्यात आले.

नंदकिशोर साळसकर यांना यापूर्वी कोकण आयडॉल हा पुरस्कार मिळाला.यापूर्वी साळसकर यांचा राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार,तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, छगन भुजबळ,विनोद तावडे,सुनील तटकरे,द.म सुखटणकर या मान्यवरांच्या उपस्थित “कोकण आयडॉल”या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

सेवानिवृत्त झालो तरी यापुढे समाजासाठी अवरीतपणे असेच काम करत रहाणार-साळसकर

गेली ३०वर्षे शासकीय सेवेत काम करत असताना नेहमीच मी लोकाभिमुख कामालाच महत्व दिले.तशी मला संधी मिळाली.आजच्या युवकांना रोजगार मिळवून देणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी मी शासकीय सेवेत असताना प्रामाणिकपणे प्रयत्न केले.यासाठी मला सर्वांचे सहकार्य मिळाले हे मी माझे भाग्य समजतो.आता सेवानिवृत्तीनंतरही आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो या भावनेतून सुरूच ठेवणार असे साळसकर यांनी बोलताना सांगितले.साळसकर यांनी २०१२-१३ साली ओबीसी आर्थिक विकास महामंडळ याव्यतिरिक्त अपंग महामंडळाचा समनव्यक म्हणून योजनेचा प्रसार व प्रचार करून शासनाचे चांगले उद्धिष्ट साध्य करून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी त्यांचा प्रसंशीयपत्र व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स