आणाव गांवचे श्री देव स्वयंभू रामेश्वर मालवणमध्ये..!
महोदया पर्वणीनिमित्त पवित्र स्नानासाठी विविध गांवचे दैवत मालवण नगरीत.
मालवण | सहिष्णू पंडित (सहसंपादक ) : हिंदू धर्मात खूप विशेष महत्त्व असलेल्या अमावस्येला 31 जानेवारीला दुपारी प्रारंभ झाला. या तिथीला महोदया पर्वणी असेही म्हणले जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक देवस्थानांचे देव मालवणमध्ये महोदया पर्वणी पवित्र स्नानासाठी येतात.
कुडाळ तालुक्यातील आणाव येथील श्री देव स्वयंभू रामेश्वर यांचे आज मंगळवारी पहाटे दोन वाजता मालवण नगरीत आगमन झाले. ढोल ताशांच्या गजरात श्री देव स्वयंभू रामेश्वर यांचे मानाचे आगमन झाले.
आणाव गावचे भाविक,मानकरी यांचा या पर्वणीसाठीचा सात्विक उत्साह अत्यंत उल्लेखनीय होता.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)