ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवणात शिवसेनेतर्फे आज व उद्या ई श्रमकार्ड शिबिराचे आयोजन.

मालवणात शिवसेनेतर्फे आज व उद्या ई श्रमकार्ड शिबिराचे आयोजन.

प्रकाशन: 01 Feb 2022 04:23 AM
वाचन संख्या 69

मालवणचे नगरसेवक श्री.यतिन खोत यांच्या निवासस्थानी शिबिराचे आयोजन.

मालवण | नझ़िरा शेख़ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे ई श्रमकार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे ई श्रमकार्ड शिबीर शिवसेनेतर्फे आयोजीत करण्यात आले आहे.
आज दिनांक 1 फेब्रुवारी आणि उद्या दिनांक 2 फेब्रुवारी अशा सलग दोन दिवशी हे शिबिर चालणार आहे.शिबिराची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 04 अशी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या ई श्रमकार्डच्या नोंदणीसाठी इच्छुकांनी त्यांच्यासोबत मोबाईलशी लिंक्ड असलेले आधारकार्ड व बॅन्क पासबुक सोबत घेऊन येणे आवश्यक असल्याचे शिबिर आयोजक शिवसेनेतर्फे सांगण्यात आले आहे.
सदर शिबिर हे मालवणचे नगरसेवक श्री यतिन खोत यांच्या निवासस्थानी संपन्न होणार असल्याची माहिती आयोजकांनी प्रसारमाध्यमांमार्फत दिली आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स