ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
असलदेत ४ फेब्रुवारीला श्री माघी गणेश जयंती उत्सव…

असलदेत ४ फेब्रुवारीला श्री माघी गणेश जयंती उत्सव…

प्रकाशन: 01 Feb 2022 10:14 AM
वाचन संख्या 63

धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन ;महिलांसाठी हळदीकुंकू संभारभ…

कणकवली |‍ उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असलदे उगवतीवाडी येथे ब्राम्हणदेव सेवा मंडळाच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे श्री माघी गणेश जयंती उत्सव २०२२ व श्री सत्यनारायणाची महापुजेचे आयोजन शुक्रवार ०४ फेब्रुवारी २०२२ रोजी आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्ताने धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
ब्राम्हणदेव सेवा मंडळ , असलदे उगवतीवाडी येथे गणेश पुजन सकाळी ९ .३० ते १०.०० वाजता,सामूहीक अभिषेक सकाळी १० वाजता,श्री. सत्यनारायणाची महापुजा सकाळी १०.३० ते ११.३० वाजता,महाआरती ११.३० वाजता , महाप्रसाद दुपारी १ ते ३ वाजता,महिलांसाठी हळदीकुंकू संभारभ, दुपारी ३.०० ते ४.०० वाजता,खेळ पैठणीचा सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी ४ ते ६ वाजता,सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी ६ ते ७ वाजता,मान्यवरांचे सत्कार,सायंकाळी ७ ते ८ वाजता,सुमधुर संगीत भजन रात्रौ ९ वाजता,स्थानिक वारकरी भजने १० वाजता होणार आहेत.
तरी सर्वांनी धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा,असे आवाहन ब्राम्हणदेव सेवा मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.सर्व कार्यक्रम शासनाच्या कोव्हीड १९ च्या सर्व अटी व नियमांचे पालन करुन होणार आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स