ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
'कोकणी रानमाणुसचा' राज्य शासनाकडून सन्मान!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

'कोकणी रानमाणुसचा' राज्य शासनाकडून सन्मान!

प्रकाशन: 27 Jan 2022 11:02 PM
वाचन संख्या 66

सिंधुदुर्गातील शाश्वत पर्यटन क्षेत्रात केलेल्या कामगिरीची घेतली दखल

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : राष्ट्रीय पर्यटन दिवसाच्या निमित्ताने मलबार हिल मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात सावंतवाडी तालुक्यातील सांगेली गावचा सुपुत्र प्रसाद गावडे अर्थात ‘कोंकणी रानमाणुसाचा’ सिंधुदुर्गातील शाश्वत पर्यटन क्षेत्रात केलेल्या कामगिरी बद्दल राज्य शासनाच्या पर्यटन मंत्रालयाकडून गौरव करण्यात आला. प्रसाद गावडे हा व्यवसायाने इंजिनिअर असून चांगलं करियर सोडून तो पर्यटन तसेच कोकणचा निसर्ग वाचवा यासाठी धडपडत असतो. पर्यटन व्यवसायासोबत व्हिडीओ व्लॉग मार्फत अनेक शाश्वत विकासांचे पर्याय, कोकणातील पर्यटन व्यवसायीकांना प्रसिद्धी आणि कोकणाची खाद्य संस्कृती, जीवन शैली याची माहिती देत लाखो लोकांपर्यंत तो पोहचलाय.
येत्या काळात राज्याच्या पर्यटन विभागा सोबत “ग्रामीण आणि समुदाय आधारित पर्यटन”(Rural and community based tourism) अंतर्गत काम करणार आहे. तसेच पर्यटन विभागाच्या क्रिएट युवर ओन स्टोरीच्या माध्यमांतून रान माणूसच्या एक्सप्लोरेशनचा नवीन व्हर्च्युअल प्रवासही राज्यातील लोकांसाठी घडविणार असल्याची माहिती प्रसाद याने दिली आहे. यावेळी पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे, प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह यांच्यासह एमटीडीसीचेअन्य अधिकारी आणि पर्यटनातील भागधारक उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स