ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कडशी नदीपात्रावरील बंधाऱ्याच्या विरोधात बाजुच्या गावातील ग्रामस्थांचे आंदोलन आणखी तीव्र होणार..!

कडशी नदीपात्रावरील बंधाऱ्याच्या विरोधात बाजुच्या गावातील ग्रामस्थांचे आंदोलन आणखी तीव्र होणार..!

प्रकाशन: 27 Jan 2022 10:53 PM
वाचन संख्या 60

बांदा | राकेश परब : कडशी नदिवर सुरु असलेल्या बंधाऱ्यांला नजीकच्या गावातील ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. केवळ एम. आय. डी सी. च्या कामासाठीच एका वर्षासाठी अशा पद्धतीचा दोन कोटी चा बंधारा बांधला जात आहे. याचा येथील ग्रामस्थांचा तीव्र विरोध असल्याचे बांदा येथील आयोजित पत्रकार परिषदेत ग्रामस्थ विलास सावंत ,डिंगणे सरपंच संजय डिंगणेकर यांनी सांगितले. यापुढेही हा लढा चालुच रहाणार असल्याचे सांगण्यात आले. संबंधित बाब मा. उद्योग मंत्री, जिल्हाचे पालकमंत्री यांना निवेदन देऊन सांगण्यात आले आले आहे परंतु येथील संबंधित खात्यांचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यावेळी जयेश सावंत, राजु सावंत, यशवंत सावंत, शैलेश लाड आदि उपस्थित होते. येथील लोकांना भविष्यात पाण्याची मोठी समस्या निर्माण होणार आहे. दैनंदिन जीवनासाठी लोकांना लागणारे पाणी व शेती बागायती साठी लागणारे पाणी मिळणे मुस्कील होणार आहे असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. काल प्रजासत्ताक दिना दिवशी नदीपात्रावर बेकायदा बांधण्यात येत असलेल्या बंधाऱ्याच्या विरोधात एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण पण करण्यात आले होते. तरीही याची दखल संबंधित खात्याच्या अधिका-यांनी घेतली नाही. या लढ्याची पुढील दिशा ठरविण्यासाठी उद्या शुक्रवारी दि. २८ रोजी सायंकाळी डिंगणे येथे कडशी नदीपात्रावर अवलंबून असलेल्या सिंधुदुर्ग व गोव्यातील सहा ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी व ग्रामस्थांची बैठक बोलविण्यात आली आहे. व पुढील आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स