ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
युवासेना आयोजित हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे चषक स्पर्धा उत्साहात संपन्न.

युवासेना आयोजित हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे चषक स्पर्धा उत्साहात संपन्न.

प्रकाशन: 27 Jan 2022 11:20 PM
वाचन संख्या 72

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ): हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त युवासेना व पटकीदेवी मित्रमंडळ हरकूळ बुद्रुक सापळेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चषक भव्य क्रिकेट स्पर्धा http://localhost/news/public/uploads/2022 उत्साहात संपन्न झाली.
या स्पर्धेचे उदघाटन कणकवली युवासेना उपशहरप्रमुख प्रतिक रासम यांच्या शुभहस्ते पार पडले. या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी दिगंबर सापळे, रमेश सापळे, सचिन सापळे, साम आर्डेकर, अशोक सापळे, सागर सापळे, बाळा सापळे, गिरीश पाटील, भूषण सापळे, अतुल घाडिगांवकर, अनिरुद्ध सातवसे, प्रणित सापळे, गणेश सापळे, तेजस सापळे आदी युवासैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ डॉ.सुहास पावसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या स्पर्धेमधे कै.रमेश पावसकर ईलेव्हन संघाने विजेतेपद तर स्टार महापुरुष शिवडाव संघाने उपविजेतेपद पटकावले. या दोन्ही संघांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम चषक तसेच वैयक्तिक चांगली कामगिरी केलेल्या खेळाडूंना बक्षिसे देण्यात आली. या बक्षिस वितरण समारंभाला दिगंबर सापळे, मारुती सापळे, प्रकाश सापळे, प्रभाकर सापळे, श्रीकृष्ण सापळे, शाम आर्डेकर, रमेश सापळे, राहुल चव्हाण, योगेश सापळे, गिरीश पाटील आदी उपस्थित.
या स्पर्धेचे यशस्वी आयोजन युवासेना माजी जिल्हाप्रमुख ॲड.हर्षद गावडे, युवासेना तालुकाप्रमुख ललित घाडिगांवकर, युवासेना उपतालुकाप्रमुख नासिर खान यांच्या सहकार्यांने कणकवली युवासेना उपशहरप्रमुख प्रतिक रासम यांनी केले.

         

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स