भाजपा दिव्यांग विकास आघाडी सिंधुदुर्गतर्फे कुडाळ तालुक्यातील डिगस ग्रा.पं.हद्दीत दिव्यांगांना ब्लँकेट वाटप तसेच दिंव्यांग भगिनींचा हळदीकुंकू समारंभ.
चिंदर / विवेक परब : भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक अनील शामू शिंगाडे यांनी कुडाळ तालुक्यातील डिगस ग्रामपंचायत हद्दीत दिव्यांगांना ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता .
या कार्यक्रमाला भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, कुडाळ तालुका सरचिटणीस देवेन सामंत, कुडाळ तालुका उपाध्यक्ष नित्यानंद कांदळगांवकर, योगेश घाडी, प्रितेश गुरव, दिव्यांग आघाडीचे जिल्हा सहसंयोजक शामसुंदर लोट, क्रीडा संयोजक संजय पवार, संगीता पवार, नैनी मंत्री, भांबाळे, कृष्णा पवार, प्रमोद पवार, संतोष झोरे, दिशा सोनार, साईनाथ पवार आदी कार्यकर्ते उपस्थतीत होते.
यावेळी दिव्यांग विकास आघाडीच्या महिला कार्यकर्त्यांनी हळदीकुंकु समारंभ केला व वाण म्हणून मास्क दिला .तसेच ” मास्क वापरा व कोरोना टाळा ” असा सामाजिक संदेश दिला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)