ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
"वेदनेतून आलेल्या संवेदनांचा आलेख म्हणजे कविता..", कवी विजय जोशी यांचे प्रतिपादन.

"वेदनेतून आलेल्या संवेदनांचा आलेख म्हणजे कविता..", कवी विजय जोशी यांचे प्रतिपादन.

प्रकाशन: 23 Jan 2022 12:57 PM
वाचन संख्या 88

माळगांव ग्रंथालयात भरला कवींचा मेळा ;नवकविंना मौलिक मार्गदर्शन.

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्त माळगांव पंचक्रोशी ज्ञानप्रसारक मंडळ ग्रंथालय,माळगांव-बागायत येथे प्रसिद्ध मालवणी कवी तथा गझल मार्गदर्शक श्री. विजय जोशी यांच्याशी साहित्यिक गप्पा आणि कवीसंमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यानिमित्ताने मालवणी कवी श्री. रुजारिओ पिंटो, श्री. प्रमोद जोशी, श्री. नितीन वाळके, श्री. मंदार सांबारी, श्री. दीपक पटेकर, श्री. संजय धुरी यांनी आपल्या कविता सादर करुन कार्यक्रमात रंगत आणली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला थोर गझलकार मधुसुदन नानिवडेकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बालवाचक कु. आर्या भोगले, स्वरा भोगले व यशश्री ताम्हणकर यांनी स्वागतगीत सादर केले. ग्रंथालय अध्यक्ष अरुण भोगले यांनी प्रास्ताविक केले. विजय जोशी यांनी कविता व गझल यांचे अंतरंग उलगडताना नवकवींना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, “वेदनेतून आलेल्या संवेदनांचा आलेख म्हणजे कविता. कवीकडे वाचन अफाट असले पाहिजे. आपल्या बोलीभाषेतून जास्तीत जास्त लेखन झाले पाहिजे. आपल्या कवितेवर संस्कार होणे फार महत्त्वाचे आहे. कवितेवर प्रेम कराल तर नक्कीच कविता तुमच्यावर प्रेम करेल.”
कवी प्रमोद जोशी यांनीही आपल्या कवितांसोबत आपले अनुभव कथन केले. “कवीने आपल्या कवितेत मांडलेल्या वेदना काही वेळा वाचक समजून घेत नाहीत” ही खंत बोलून दाखवताना रसिकांनी कवितेतील भावना समजून त्याचा आस्वाद घ्यावा ही अपेक्षा व्यक्त केली.


यावेळी नितीन वाळके यांनी साहित्यिक परिसंवाद घडवून आणला. यात ज्योती तोरसकर, अर्चना कोदे, मंदार सांबारी यांनी सहभाग घेतला. श्री. विजय जोशी यांनी साहित्य क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ग्रंथालयाच्या वतीने श्री रुजारिओ पिंटो यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रंथालय अध्यक्ष अरुण भोगले, सचिव गुरुनाथ ताम्हणकर, दीपक भोगले, ज्योती तोरसकर, अर्चना कोदे, महादेव सुर्वे, अरुण वझे, दत्ताराम भोगले, बापू राणे, मोडक, तन्वी राणे, छाया नाईक, मनाली परब व वाचक ग्रामस्थ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स