ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
मसुरे देऊळवाडा दत्तवाडी येथे १६ डिसेंबर पासून दत्त जयंती उत्सव!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

मसुरे देऊळवाडा दत्तवाडी येथे १६ डिसेंबर पासून दत्त जयंती उत्सव!

प्रकाशन: 14 Dec 2021 04:49 PM
वाचन संख्या 44

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर: मसुरे देऊळवाडा दत्तवाडी येथील श्री समर्थ बागवे महाराज संस्थानच्या दत्त मंदिरात १६ ते १९ डिसेंबर या कालावधीत दत्त जयंती उत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १६ डिसेंबर रोजी सायं. ५ वा. नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा. १७ रोजी सकाळी श्री दत्त गुरुचे पूजन, श्री दत्त गुरूंच्या पादुकांवर अभिषेक व महाआरती, रात्रौ. ०८ वा. भजनी बुवा श्री अरुण घाडी(कुडाळ) व श्री संदिप लोके (देवगड) यांचा २० – २० भजन सामना, व अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम होणार आहे. १८ रोजी सकाळी श्री दत्त गुरूंचे पूजन, पादुकांवर अभिषेक, दुपारी महाआरती, सायंकाळी गुरुचरित्र पोथी पूजन, स्थानिक पंचक्रोशीतील भजने, रात्री दीपोत्सव, रात्री १२ वा. दत्तजन्म सोहळा, पालखी सोहळा व श्री समर्थ बागवे महाराज भजन मंडळाचे दिंडी नृत्य होणार आहे. १९ रोजी सकाळी श्री दत्तगुरूंचे पूजन, श्री दत्तगुरूंच्या पादुकांवर अभिषेक, दुपारी महाआरती, २ ते ५ वा. महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत. कोरोनाविषयक नियम पाळून भाविकांनी सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन श्री समर्थ बागवे महाराज संस्थानाच्या वतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स