ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
जिल्हा परीषदेच्या रस्त्यावर मालकी हक्क सांगणाऱ्या खाणमालकाचा  परवाना , जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांनी रद्द केला.जि.प.अध्यक्षा सौ. संजना सावंत यांनी ही माहिती दिली.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

जिल्हा परीषदेच्या रस्त्यावर मालकी हक्क सांगणाऱ्या खाणमालकाचा परवाना , जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांनी रद्द केला.जि.प.अध्यक्षा सौ. संजना सावंत यांनी ही माहिती दिली.

प्रकाशन: 13 Dec 2021 06:30 PM
वाचन संख्या 27

ओरोस प्रतिनिधी : हेदुळ सडावाडी धनगर वस्तीत जाणारा http://localhost/news/public/uploads/20 वर्षापूर्वीचा रस्ता जिल्हा परिषद मालकीचा रस्ता स्वमालकीचा असल्याचे सांगत सडावाडी येथील धनगर वस्तीवर जाणारा रस्ता अडविणाऱ्या खाण मालकाचा परवाना जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी रद्द केला असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी दिली. जिल्हा परिषद मालकीच्या रस्त्यावर स्व हक्क गाजवत व तो रस्ता उखडून टाकत चिरेखाण व्यवसाय सुरू करणाऱ्या चिरेखाण मालक पालकर यांनी बळजबरीने तेथील ग्रामस्थांचा रस्ता अडविला होता. याबाबत तेथील ग्रामस्थ व मालवण पंचायत समिती गटनेते अनिल घाडीगावकर यांनी या प्रश्नाविषयी जि प अध्यक्ष संजना सावंत यांची भेट घेत सदरील रस्ता हा जि प मालकीचा असल्याने तो त्वरित सुरू करा अशी मागणी केली होती. मात्र सदरील जागा ही आपण पाच वर्षापूर्वी खरेदी केली असून या रस्त्याची नोंद ओवळीये ग्रामपंचायत व हेदुळ ग्रामपंचायत मध्ये नोंद नसल्याने हा रस्ता अनधिकृत असल्याचे सांगत सडावाडी धनगर वस्ती वर जाणारा रस्ता अडविण्याचा प्रकार देखील खाणमालक यांनी केला होता. मात्र याबाबत चौकशीचे आदेश जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी कुडाळ मालवण प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांना दिले होते तर आज प्रांताधिकारी खरमाळे यांच्या चौकशी अहवालानंतर हेदुळ येथील त्या खाण व्यावसायिकाचा परवाना रद्द केला असल्याची माहिती जिप अध्यक्षा संजना सावंत यांनी आज दिली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स