रक्ताचं नात जपणारे आदर्शवत पत्रकार राजन चव्हाण रक्तदान जीवनदान, मानवतेचे महाभियान' असे ब्रीदवाक्य घेऊन तब्बल २५ हुन अधिक वेळा रक्तदान
कणकवली / उमेश परब : रक्तदान हे श्रेष्ठदान म्हणून ओळखले जाते. आणि या रक्तदानामुळे आपण अनेक रक्ताची नाती जोडू शकतो.अशीच अनेक रक्ताची नाती जोडणारे रक्तमित्र म्हणजे कणकवली येथील पत्रकार राजन चव्हाण. आज असंच अजून एक रक्ताचं नातं त्यांनी आपल्या कामामुळे आपल्याशी जोडलंय. प्रसूतीसाठी आलेल्या एका गरोदर मातेला तातडीने रक्ताची गरज असताना राजन चव्हाण यांनी वेळ न दवडता सावंतवाडी येथील रक्तपेढीत जाऊन रक्तदान केले. १३ डिसेंबर रोजी कुंब्रल ता. दोडामार्ग येथील रुपाली गोविंद परब यांना प्रसूतीसाठी सावंतवाडी येथील कॉटेज हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं होतं. मात्र प्रसूतीसाठी त्यांना बी निगेटिव्ह रक्ताची गरज होती आणि हा रक्तगट दुर्मिळ असल्याकारणाने परिस्थिती प्रतिकूल बनली होती. ही परिस्थिती सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे सदस्य राजन चव्हाण यांना समजताच त्यांनी वेळ न दवडता सावंतवाडी गाठली आणि येथील रक्तपेढीमध्ये अमूल्य आणि दुर्मिळ असलेले बी निगेटिव्ह रक्तदान केले. राजन चव्हाण हे वयाच्या १८ व्या वर्षापासून रक्तदान करत आहेत. आजचे त्यांनी केलेले रक्तदान हे २५ वे रक्तदान होते. ‘रक्तदान जीवनदान, मानवतेचे महाभियान’ असे ब्रीदवाक्य घेऊन आणि त्याला सतत जागून रक्तदानासाठी सदैव कार्यशील असणाऱ्या सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून अशी रक्ताची अनेक नाती जोडली गेलीत. तशीच अनेक रक्ताची नाती जोडणाऱ्या पत्रकार राजन चव्हाण यांच्या या कार्यतत्परतेचे सगळीकडून कौतुक होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)