ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
ख्रिस्तमस आणी नवीन वर्ष समारंभानिमित्त होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमाबाबत सामाजिक बांधिलकी जोपसण्यासाठी हिंदू जनजागृती समितीचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

ख्रिस्तमस आणी नवीन वर्ष समारंभानिमित्त होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमाबाबत सामाजिक बांधिलकी जोपसण्यासाठी हिंदू जनजागृती समितीचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

प्रकाशन: 13 Dec 2021 06:23 PM
वाचन संख्या 26

ओरोस /प्रतिनिधी : ख्रिसमसनिमित्त २५ डिसेंबर आणि नववर्षाच्या निमित्ताने ३१ डिसेंबरच्या दिवशी होणाऱ्या सर्व प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांवर आणि फटाके फोडण्यावर बंदी घालावी. प्रमुख पर्यटनस्थळे, गड-किल्ले, ऐतिहासिक स्थळे आदी सार्वजनिक ठिकाणांवर मद्यपान, धूम्रपान, पार्ट्या करण्यावर प्रतिबंध आणावा. तसेच पोलिसांची गस्तीपथके नेमून याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी, याबाबत चे निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी दतात्रय भडकवाड याना देण्यात आले.

३१ डिसेंबरच्या रात्री मोठ्या प्रमाणात धूम्रपान, मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन आदी केले जाते. तसेच या रात्री मद्यपान करून भरधाव वाहने चालवल्याने अपघातही होत आहेत. गंभीर बाब म्हणजे या रात्रीपासून मद्य पिण्यास आरंभ करणार्या युवा पीढीचे प्रमाण लक्षणीय असून यामध्ये अल्पवयीन मुले आणि महिला यांचाही समावेश आहे. रात्रभर मोठ्या आवाजाचे फटाके उडवून प्रदूषण करणे, तसेच कर्णकर्कश ध्वनीवर्धक लावणे, अश्लील अंगविक्षेप करून नाचणे, शिवीगाळ करणे, मुलींची छेडछाड, विनयभंग, बलात्कार आदी कृत्ये करून एकूणच कायदा अन् सुव्यवस्था यांच्या दृष्टीने गंभीर स्थिती निर्माण होत आहे . त्याचा अतिरिक्त ताण पोलीस आणि प्रशासन यांवर येतो. तसेच यामुळे देशाची युवापिढी नैतिकदृष्ट्या उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.

गेली दोन वर्षे कोरोना महामारीने देशभरात कहर केला आहे. ओमीक्रॉन नावाच्या कोरोनाच्या नवा व्हेरीयंटमुळे पुन्हा जगभरात कोरोनाची लाट येण्याची शक्यता आहे. फटाके फोडल्याने प्रदूषण होऊन मोठ्या प्रमाणात श्वसनाचे त्रास वाढतात. २५ डिसेंबर पासून ३१ डिसेंबरपर्यंत मोठ्या प्रमाणात पार्ट्या होतात, याद्वारे कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यताही अधिक आहे . या काळात सार्वजनिक आरोग्य धोक्यात घालणे परवडणारे नाही. त्यामुळे ख्रिसमसनिमित्त २५ डिसेंबरला आणि ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्ताने ३१ डिसेंबरच्या दिवशी होणाऱ्या सर्व प्रकारच्या सार्वजनिक साजरीकरणावर ( सेलिब्रेशनवर ) आणि फटाके फोडण्यावर बंदी घालावी. प्रमुख पर्यटनस्थळे , गड-किल्ले, ऐतिहासिक स्थळे आदी सार्वजनिक ठिकाणांवर मद्यपान धूम्रपान अन् पार्ट्या करण्यावर प्रतिबंध आणावा. पोलिसांची गस्तीपथके नेमून याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी दतात्रय भडकवाड यांना निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी निवेदन देताना गजानन मुंज, रवींद्र परब, डॉ. अशोक महिंद्रे उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स