ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
चौके गोंडयाचि वाडी येथे टुरिस्ट बसने शाळकरी मुलाला ठोकरले

चौके गोंडयाचि वाडी येथे टुरिस्ट बसने शाळकरी मुलाला ठोकरले

प्रकाशन: 07 Dec 2021 09:16 PM
वाचन संख्या 28

चौके /प्रतिनिधी: गोवा येथील टुरीस्ट बस ने शाळकरी विद्यार्थी ला उडविलेअपघातात १२ वर्षिय शालेय विद्यार्थ्यांचे दोन्ही पाय निकामी. चौके – गोड्याचीवाडी येथील घटना . मालवण वरुन पर्यटन करुन चौके मार्गे गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या टुरीस्ट बसने चौके गोड्याची वाडी येथील बसस्टाँप नजीक शाळेतून घरी परतताना रस्ता ओलंडणाऱ्या १२ वर्षीय शालेय मुलाला समोरुन ठोकर दिल्याने बसची चाके विद्यार्थ्यांच्या पायावरुन गेली आणि त्याच्या दोन्ही पायाना गंभीर दुखापत झाली. या अपघातामुळे त्या मुलाचे दोन्ही पाय निकामी झाल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थांकडून देण्यात आली. मालवण पर्यटन करुन पर्यटकांना घेऊन चौके मार्गे गोव्याच्या दिशेने सुसाट वेगाने टुरीस्ट बस चालक हरी मात्रु करंगुटकर रा. म्हापसा शिवोली हा त्याच्या ताब्यातील GA-03 W -9810 या बसने मंगळवारी सांयकाळी जात असताना 5.15 वाजण्याच्या दरम्यान चौके गोड्याची वाडी येथे शिवाजी विद्यामंदिर काळसे या शाळेतून आपल्या घरी निघालेल्या इयत्ता सहावीत शिक्षण घेणाऱ्या कु. निनाद नारायण मांडलकर या 12 वर्षीय विद्यार्थ्यांला चौके – गोड्याचीवाडी येथे रस्ता ओलंडताना जोरदार धडक दिली यात निनादच्या दोन्ही पायावरुन प्रवासी भरलेली बस गेल्याने गंभीर दुखापत झाली. तेथील ग्रामस्थ प्रभाकर परब , गौरव मांडलकर,विश्राम कदम, तसेच चौके येथील बंड्या गावडे, गोट्या गावडे यांनी तात्काळ धाव घेत या शालेय विद्यार्थ्यांला अधिक उपचारासाठी कुडाळ येथे नेले. यावेळी घटनास्थळी उपस्थितांनी बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या बसच्या चालकाला मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात दिले. मालवण पोलिस ठाणे चे पोलीस संतोष पुटवाड, वाय. डब्ल्यू . सराफदार यांनी घटनास्थळी येत घटनेचा पंचनामा केला. आणि अधिक तपास करत आहेत. गोव्याहून येणारे वहानचालक सुसाट*गोव्यावरुन मोठ्या प्रमाणावर सिधुंदुर्गात पर्यटनासाठी पर्यटक घेऊन येणारे वहानचालक सुसाट वेगात असतात या वाहनचालकांकडून अनेक अपघात होत असतात अशी माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली आणि यांना वेळीच आवर घालावा अशी मागणी पोलीसांकडे केली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स